केंद्र सरकारतर्फे नुकतचं ६७ वे राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार जाहीर करण्यात आले. 'पंगा' आणि 'मणिकर्णिका द क्विन ऑफ झासी' या दोन सिनेमांसाठी उत्कृष्ट अभिनेत्रीचा मान कंगना रानौतला मिळाला. उत्कृष्ट अभिनेताचे मानकरी दोन अभिनेते ठरले. मनोज वाजपेयीला 'भोसले' या सिनेमासाठी मान मिळाला. तर धनुषला 'असुरन' या तमिळ सिनेमासाठी उत्कृष्ट अभिनेता हा पुरस्कार जाहीर झाला आहे. 

यंदाच्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारात मराठी सिनेमेटोग्राफी मागे हकलेले नाही.
सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपटाचा मान 'बार्डो' या सिनेमाने मिळवला आहे. मकरंद देशपांडे, अंजली पाटील यांची मुख्य भुमिका असलेल्या सिनेमाच्या पार्श्व गायनाचा सुद्धा मान मिळाला आहे. सावनी रविंद्र सर्वोत्कृष्ट पार्श्वगायिकेचा मान मिळाला आहे. 

दशअवतारात काम करणाऱ्या कलाकारांच्या जीवनावर भाष्य करणाऱ्या 'पिकासो' सिनेमाची सुद्धा दखल घेतली गेली आहे. अभिजित वारंग यांचा हा सिनेमा असून प्रसाद ओक मुख्य भुमिका साकारत आहे. 

साऊंड डिझाईनिगसाठी अक्षय इंडिकरच्या त्रिज्या सिनेमाला राष्ट्रीय पुरस्कार जाहीर झाला आहे.  मंदार कमलापुर यांना हा पुरस्कार मिळाला आहे. 

'खिसा' या लघुपटाला नॉन फिचर शॉर्ट फिल्म हा पुरस्कार जाहीर करण्यात आला. कैलास वाघमारे यांनी लेखनाची धुरा सांभाळली आहे, तर राज मोरे यांनी दिग्दर्शनाची. 

सर्वोत्कृष्ट चित्रपटाचं कमळ हे कोकणी सिनेमा काजरोला प्राप्त झालं आहे.

<iframe width="560" height="315" src="https://www.youtube.com/embed/1W2wC3AsPpw" title="YouTube video player" frameborder="0" allow="accelerometer; autoplay; clipboard-write; encrypted-media; gyroscope; picture-in-picture" allowfullscreen></iframe>