सुंदरा मनामध्ये भरली ही मालिका प्रेक्षकांच्या पसंतीस उतरते आहे. हल्लीच अभिमन्यू आणि लतिका यांच्या लव्हस्टोरीला सुरुवात झाली आहे. अभिमन्यू याने लतिकाला रोमॅंटिक अंदाजात प्रपोज केलयं. तर मालिकेत वेगवेगळे व्टिस्ट आपल्याला पहायला मिळणार. या मालिकेतील सगळे कलाकार आपली भुमिका चोख बजावतात. विशेष म्हणजे मालिकेतील आजीची भूमिका लोकांच्या पसंतीस उतरते आहे. निशा कोठावडे हे आजीची भुमिका साकारत आहेत. कलर्स मराठीच्या रेड कार्पेटवर त्यांचा हटके अंदाज पहायला मिळाला. नेहमी पारंपरिक ंअंदाजात दिसणाऱ्या आजी चक्क स्टायलिश वाईट गाऊनमध्ये झळकल्या. 

पहिल्यांदाच त्या अंदाजात प्रेक्षकांसमोर आल्या आहेत. तर इतर कलाकार देखील स्टायलिश अंदाजात दिसले. पण निशा यांचा हा थक्क करणारा लुक सर्वांचे लक्ष वेधून घेतोय. मग तुम्हाला आजीचा साडीतला लुक आवडला की हटके डॅशिंग लुक आवडला? या मालिकेतलं कोणतं पात्र जास्त आवडतं कमेंटमध्ये सांगा.