आपल्याआयुष्यातील प्रवास कुठल्यातरी कारणासाठी खूप महत्वाचा होऊन जातो आणि कायम आपल्या लक्षात राहतो. अश्या एका सुंदर कथानकावर आधारित आरॉन ह्या चित्रपट आज प्रेक्षकांच्या भेटीला आला.उत्तम कथानकावर आधारित चित्रपट सध्या मराठीमध्ये वरचढ ठरत आहे आणि त्या रांगेत आरॉन देखील उभा राहतो. सर्वच नाती आपल्यासाठी खूप खास असतात परंतु आई आणि मुलाचं नातं हे जितकं मजबूत असतं तितकंच हळवं असतं. आरॉन चित्रपट आपल्याला खरेपणाची जाणीव करून देतो.

शशांक केतकर म्हणजे माधव आपटे आणि त्याची बायको नेहा जोशी म्हणजेच सुनंदा आपटे दोघेही कोकणात राहत असतात. बाबू म्हणजेच अथर्व पाध्ये आणि त्याची आई एलिटा हे मूळचे फ्रांस चे. नवरा वारल्यानंतर एलिटा बाबू ला त्याच्या काका काकू कडे म्हणजेच कोकणात सोडते आणि स्वतः मात्र पुन्हा फ्रांस ला निघून येते. 

बाबू ला मोठं करता करता सुनंदा कधी त्याची आई होऊन जाते हे तिलाच काळत नाही.मात्र बाबू च्या दहावी नंतर त्याला पुन्हा फ्रांस ला पाठवायची वेळ येते. आणि मग गोष्ट कशी पुढे जातेआरॉन नक्की कोण आहे..?ह्या नावाचा नेमका अर्थ काय हे जाणून घेण्यासाठी तुम्हाला हा चित्रपट पाहावा लागेल.

चित्रपटाची जमेची बाजू म्हणजे चित्रपटाचे बॅकग्राउंड म्युझिक. सिन ला साजेस म्युझिक दिल्यामुळे चित्रपट अजून बहरतो. शशांक केतकरने नेहमी प्रमाणे आपल्या अभिनयाची छाप आरॉन चित्रपटात सुद्धा सोडली आहे. स्वस्तिका मुखर्जी ह्या अभिनेत्री ने तिच्या पहिल्याच मराठी चित्रपटात उत्तम काम केले आहे. 

अथर्व पाध्ये म्हणजेच बाबू सुद्धा चित्रपटात मस्त वावरलाय. चित्रपट संपल्यानंतर सुद्धा जिचा अभिनय लक्षात राहतो ती अभिनेत्री म्हणजे नेहा जोशी. काही प्रसंगी वाक्य नसताना सुद्धा नुसत्या आपल्या अभिनयातूनही नेहा खूप काही बोलून गेली. सुनंदा साकारताना आपण नेहा ला स्क्रीन वर बघतोय हे आपण विसरून जातो. जिवंत अभिनय करून नेहा ने तिच्या ह्या चित्रपटात बॅटिंग केली आहे असे म्हंटल तर वावघ ठरणार नाही.

चित्रपटाला दोन गोष्टी खाली आणतात ते म्हणजे चित्रपटाचं कमकुवत स्क्रिप्टिन्ग आणि चित्रपटाचा शेवट. चित्रपटाचा शेवट अजून थोडा चांगला करता आला असता. सिनेमातील तांत्रिक बाजू बऱ्या पैकी जमून आल्या आहेत.सुंदर कोकण आपल्याला आरॉन मध्ये बघता येईल. परंतु मोठ्या पडद्यावर फ्रान्स तितकासा उठून दिसला नाही.

विकेंड एन्जॉय करायचा असेल तर एकदा हा चित्रपट तुम्ही जाऊन पाहू शकता. itsmajja.com तर्फे आरॉन चित्रपटाला ३ स्टार्स.