ज्या चित्रपटाची प्रेक्षक आतुरतेने वाट बघत होते तो माऊली चित्रपट आज अखेर प्रेक्षकांच्या भेटीला आला. चित्रपटाच्या पहिल्याच अनाउन्समेंट पासून ह्या चित्रपटाला प्रेक्षकांची पसंती मिळाली. लय भारी चित्रपट हा रितेश च्या अभिनयाने चित्रपटातील भन्नाट डायलॉग्स मुळे आणि चित्रपटातील गाण्यांमुळे बराच गाजला.माऊली चित्रपटात देखील भन्नाट डायलॉग बाजी तुम्हाला ऐकायला मिळेल.

६ वर्षांत तिसऱ्यांदा पोस्टिंग घेऊन पोलीस अधिकारी माऊली देशमुख एका गावात येतो. साधा,सरळ आणि तत्वांवर चालणाऱ्या हा माऊली गावातल्या अडचणी कसा सोडवतो अशी साधारण कथा माऊली चित्रपटाची आहे. पण तुम्ही विचार कराल कि ट्रेलर मध्ये दाखवलेला रावडी आणि टेरर असा इन्स्पेक्टर कोण आहे तर ह्या सर्व गोष्टींची उत्तर तुम्हाला चित्रपट कळेल.

माऊली च्या भूमिकेत असलेल्या रितेश ने उत्तम काम करून पुन्हा एकदा स्वतःला सिद्ध केले आहे. एका चित्रपटात दोन भिन्न भूमिका रितेश ने साकारल्या आहेत आणि विशेष म्हणजे हे करताना एका भूमिकेचा प्रभाव दुसऱ्या भूमिकेवर झाला नाही हि आनंदाची बाब. संयमी खेर ह्या अभिनेत्री ने गावरान टोन बऱ्यापैकी जपला आहे. भूमिकेला साजेसा अभिनय केल्यामुळे संयमी चित्रपटात बऱ्यापैकी वावरली आहे. 

सिद्धार्थ जाधव च्या भूमिकेने नेहमी प्रमाणेच प्रेक्षकांना हसवलं देखील आणि त्याच्या जिवंत अभिनयाने डोळ्यात पाणी देखील आणलं. चित्रपट संपल्यावरही ज्याची भूमिका शेवट पर्यंत लक्षात राहते तो अभिनेता म्हणजे जितेंद्र जोशी. खलनायकाची ची भूमिका साकारताना जेव्हा त्या व्यक्तीचा आपल्याला राग यायला लागतो तेव्हा समजून जावं कि भूमिका उत्तम होत आहे. जितेंद्र ने साकारलेल्या नाना च्या बाबतीत तेच झालं चित्रपटभर आपल्याला त्या खलनायकाचा राग येत असतो आणि हीच जितेंद्र जोशी साठी प्रेक्षकांची खरी पोचपावती असेल.

ऍक्शन पॅक चित्रपट असल्यामुळे दिग्दर्शन हि तेवढंच कमालीचं असणं गरजेचं होत आणि ते माऊली चित्रपटात आदित्य सरपोतदार ने यशस्वी करून दाखवलं. दिग्दर्शनाच्या बाबतीत हा चित्रपट अव्वल ठरला आहे. चित्रपटाचे काही डायलॉग्स देखील लक्ष वेधून घेतात अजून एक विशेष कौतुक करावस वाटत ते म्हणजे चित्रपटाच्या बॅकग्राउंड स्कोर चे. प्रत्येक सिन ला साजेस असा स्कोर देऊन प्रत्येक सिन ठळक करण्यात हा चित्रपट यशस्वी झाला आहे.

ह्या सगळ्यांमध्ये एक गोष्ट चित्रपटाला खाली आणते ते म्हणजे चित्रपटाची कथा. चित्रपटाची कथा प्रेक्षकांना खिळवून ठेवत नाही. चित्रपटाचा पहिला भाग खूप संथ वाटतो. रोमँटिक गाणे सोडल्यास बाकी गाणी उत्तम झाली आहेत. विकेंड एन्जॉय करायचा असेल तर माउली सर्जेराव देशमुखांना भेटा,आणि तुम्हाला हि आवडले तर आम्हाला सांगायला विसरू नका कारण शेवटी रितेश देशमुख आहे नाराज करणार नाय…
Mauli चित्रपटाला itsmajja.com तर्फे ३ स्टार्स.