जेष्ठ अभिनेते, दिग्दर्शक महेश कोठारे यांच्या कोठारे व्हिजनची निर्मिती असलेली नवी पौराणिक मालिका, 'दक्खनचा राजा' हि लवकरचं आपल्या भेटीला येणार आहे. आणि दरवळे प्रमाणे पौराणिक मालिकेचा दर्जा सांभाळत प्रेक्षकांना काही तरी नवीन आणि वेगळं देण्याच्या धडपडीमध्ये असणारे कोठारे व्हिजन नेहमीच प्रेक्षकांची मने जिंकतात. फक्त मालिकेची कथा नाही तर मालिकेमधील, पात्र सुद्धा तेवढीच दमदार अशी असतात. आणि याच मालिकेसाठी अभिनेता विशाल निकम यांनी केलेली तयारी सुद्धा खूप मेहनत घेतली आहे. 

'दक्खनचा राजा' या मालिकेमध्ये विशाल निकम हा अभिनेता, जोतिबांची मुख्य भूमिका साकारणार आहे. आणि या भूमिकेसाठी लागणारं भारदस्त शरीरयष्टी कमावण्यासाठी विशालने बरीच मेहनत केली आहे. नुकतंच विशालने त्याच्या इंस्टाग्राम अकाउंटवर त्याच्या ओर्कुआऊटचा एक व्हिडिओ शेअर केला आहे. My journey Towards “दख्खनचा राजा जोतिबा” असं कॅप्शन देत, अभिनया सोबतंच स्वतःला जोतिबांच्या भूमिकेमध्ये साकारण्यासाठी विशाल निकम याने हि सारी मेहनत घेतली आहे. विशालला आधी पासूनचं फिटनेसच वेड होत, आणि त्याबद्दल असणारी ओढ़ सुद्धा आपण त्याच्या इंस्टाग्राम अकाउंटवरून बघू शकतो. एखादी दमदार भूमिका जर साकारायची असेल तर, कलाकाराला सगळ्या पद्धतीने मेहनत करावी लागते आणि तरचं तो कलाकार किंवा त्याने साकारलेली भूमिका हि प्रेक्षकांच्या पसंतीस पडते. आणि हेच ध्येय समोर ठेवतं, विशालने स्वतःवर मेहनत घेत १२ किलो वजन वाढवले आहे. आणि आता संपूर्णपणे तयार झाल्या नंतर, विशाल निकम जोतिबांची आव्हानात्मक भूमिका तो कशी साकारेल हे पाहण्यात खरी रंगत आहे.