महाराष्ट्र नवनिर्माण सेना या पक्षाचे अध्यक्ष मा. राज ठाकरें, यांचं आणि कलेचं नातं खूप जुनं असं आहे. स्वतः एका पक्षाचे अध्यक्ष जरी असले तरी सुद्धा, मराठी सिनेमा आणि मराठी कलाकरांना राज ठाकरेंचा नेहमीच पाठिंबा मिळाला आहे. मग त्यामध्ये मराठी चित्रपटाला प्रदर्शित होण्यासाठी मिळणाऱ्या स्क्रीनचा वाद असो किंवा मग कोणत्या एका कलाकारांचे, त्याच्या कामाचे कौतुक असो, राज ठाकरें हे नेहमीच एका आधारस्तंभा सारखे सगळ्यांसोबत उभे असतात. 

आणि याच एक उत्तम उदाहरण म्हणजे राज ठाकरे यांनी, मराठी अभिनेता भरत जाधव आणि दिग्दर्शक केदार शिंदे यांच्या आगामी मालिकेसाठी दिलेल्या शुभेच्छा. नुकतंच भारत जाधव यांनी त्यांच्या इंस्टाग्राम अकाउंटवर राज ठाकरें यांनी केलेल्या ट्विटचा फोटो शेअर केला आहे. ज्यामध्ये राज ठाकरें यांनी “कोरोनाचं सावट आणि त्यामुळे आलेलं आर्थिक संकट यामुळे सगळ्यांचा आनंदच कुठेतरी हरवला आहे. केदार शिंदेच्या ‘सुखी माणसाचा सदरा’ या लॉकडाऊननंतरच्या पहिल्या नव्या दूरदर्शन मालिकेमधून ते सुख, तो आनंद सापडेल किंवा सापडू दे असं मनापासून वाटतं”, “भरत जाधवला बऱ्याच वर्षांनी पुन्हा छोट्या पडद्यावर आलेलं पाहून छान वाटलं. या सगळ्या अस्वस्थ, अनिश्चिततेच्या वातावरणात तुमचा ‘सुखी माणसाचा सदरा’ रोज किमान अर्धा तास तरी मराठी मनांना या अनिश्चिततेतून ब्रेक देईल आणि लोकांच्या चेहऱ्यावर हास्य आणेल. अश्या मोजक्याच पण सुंदर शब्दांमध्ये ट्विट करत, भरत जाधव आणि केदार शिंदे यांना शुभेच्छा देत त्यांचे आभार सुद्धा मानले आहेत. अभिनेता भरत जाधव यांनी सुद्धा सोशल मिडीयाच्या मार्फत त्यांच्या ‘सुखी माणसाचा सदरा’ या नव्या मालिकेचा टिझर आपल्या सोबत शेअर केला असून, येत्या दसऱ्याला म्हणजेच २५ ॲाक्टोबरला कलर्स मराठी वाहिनी वर प्रदर्शित होणार आहे. आणि पुन्हा एकदा आपला मालिकेकडे वळत, अभिनेता भरत जाधव हे नेहमीप्रमाणे सगळ्याचं प्रेक्षकांचं मनोरंजन करतील यामध्ये काही वाद नाही.