गेले अनेक दिवस मराठी बिग बॉस फेम अभिनेत्री सई लोकूर हि सगळ्या प्रेक्षकांच्या चर्चेचा विषय बनली होती. आणि यामागचं कारण सुद्धा तसंच काहीस होत. सई लोकूर हिने नुकतंच तिच्या लाईफ पार्टनर सोबतचा आणि त्यानंतर मेहंदी भरल्या हाताचा फोटो पोस्ट केला होता. परंतु हा फोटो पाठमोरा असल्यामुळे, सई लोकुरचा लाईफ पार्टनर  कोण आहे ? हा प्रश्न तिच्या सगळ्या चाहत्यांना पडला होता. 

पण आता सई लोकूर हिने तिच्या चाहत्यांचा सगळ्या प्रश्नांच उत्तर दिल आहे. सई लोकूर हिने नुकचत तिचा साखरपुड्याचे काही खास फोटो तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर शेअर केले. आणि या फोटोमधूनच, सईने तिच्या चाहत्यांच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरे सुद्धा दिली. त्रिथदिप रॉय असं सईच्या होणाऱ्या नवऱ्याचं नाव असून, त्यांचा साखरपुडा पार पडला. I love you and that's the beginning and end of everything, असं सुंदर कॅप्शन देत सईने तिच्या साखरपुड्यामधील काही सुंदर क्षणांचे फोटो सगळ्यांसोबत शेअर केले आहेत. एवढे दिवस सगळ्यांना गोंधळात आणि कोड्यात ठेवल्यानंतर आज जाऊन, सई लोकूर हिने तिच्या चाहत्यांना हि आनंदाची बातमी दिली आहे. आणि दरवेळे प्रमाणे यावेळी सुद्धा सईच्या या फोटेजला तिच्या सगळ्या चाहत्यांनी लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव करत, तिचं अभिनंदन केलं आहे.