मुंबईतील मराठी माणसाची गॅंग सुरु करणाऱ्या अरुण गवळी आणि त्यांचा बालेकिल्ला असणाऱ्या दगडी चाळीवर आधारित, अंकुश चौधरी, पूजा सावंत आणि मकरंद देशपांडे यांची मुख्य भूमिका असलेला 'दगडी चाळ' या चित्रपटाचे सगळ्या प्रेक्षकांनी कौतुक केले. आणि आज सुद्धा या चित्रपटाची जादू तशीच कायम आहे. 

चित्रपटाची स्टोरी, त्यामधील कलाकार आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे, मकरंद देशपांडे यांनी साकारलेल्या डॅड्डीची भूमिका आणि त्यांचा ' चुकीला माफी नाही ' हा दमदार डायलॉग या सगळ्यामुळे आज सुद्धा प्रेक्षक हा चित्रपट तेवढ्याच आवडीने बघतात. नुकतंच या चित्रपटामध्ये मुख्य भूमिका साकारणारी ब्युटीफुल अभिनेत्री पूजा सावंत हिने तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर एक पोस्ट शेअर केली आहे. आणि हि पोस्ट आहे दगडी चाळ या चित्रपटाला पूर्ण झालेले पाच वर्ष. २०१५ मध्ये प्रदर्शित झालेल्या दगडी चाळ या चित्रपटामधून अंकुश चौधरी आणि पूजा सावंत हि जोडी आपल्यासमोर आली. आणि या चित्रपटामध्ये ऍक्शन, दंगा, सस्पेन्स यासोबतच या दोघांची जोडी सुद्धा प्रेक्षकांच्या पसंतीस पडली. आणि याच चित्रपटाची आठवण म्हणून पूजाने हि पोस्ट शेअर केली आहे. दगडी चाळ या चित्रपटामधील गाणी, त्यामधील ऍक्शन सीन्स या सगळ्या गोष्टींमुळे हा चित्रपट हिट ठरलाच. पण त्यापेक्षा जास्त चित्रपटामध्ये मकरंद देशपांडे यांनी साकारलेली अरुण गवळी उर्फ डॅड्डीची भूमिका आज सुद्धा प्रेक्षकांच्या लक्षात आहे. आणि म्हणूनच आज ५ वर्षांनंतर सुद्धा हा चित्रपट सगळ्या प्रेक्षकांचं मनोरंजन करतो.