फर्जंद चित्रपटामधून आपल्या भेटीला आलेला, आणि मराठी मध्ये पदार्पण करत सगळ्या प्रेक्षकांना त्याच्या अभिनयाची नवीन ओळख करून देणारा एक हँडसम अभिनेता म्हणजेच अंकित मोहन. फर्जंद या मराठी चित्रपटामधून, मराठी भाषिक प्रेक्षकांच्या समोर येत अंकितने खूप कमी वेळातच त्यांचा एक वेगळा चाहता वर्ग बनवला आहे. 

फर्जंद नंतर फत्तेशिकस्त मध्ये सुद्धा आपल्या अभिनयाने सगळ्यांचे मनोरंजन करत, मराठी चित्रपटसृस्ष्टी मध्ये सुद्धा आपल्या नावाचा डंका वाजवला आहे. अंकित मोहन एक उत्तम अभिनेता तर आहेच पण त्याच सोबत त्याला फिटनेसचं सुद्धा भलतंच वेड आहे. फर्जंद आणि फत्तेशिकस्त मधून त्याचे पिळदार शरीर आणि त्या साठी त्याने घेतलेली मेहनत हे सार काही आपण चित्रपटामध्ये बघितलंच आहे. आणि दरवेळेला अंकित सुद्धा त्याच्या इंस्टाग्राम अकाउंटवर त्याच्या फिटनेसचे आणि व्यायाम करतानाचे व्हिडिओ आणि फोटो शेअर करत असतो. आणि नुकतंच अंकितने त्याच्या बायको सोबतचा म्हणजेच रुची सवर्ण सोबत एक फोटो शेअर केला आहे. अंकित प्रमाणेच रुचीला सुद्धा फिटनेसची आवड असल्याचं आपण पाहू शकतो. Beauty & her Beast on Fitness Feast असं कॅप्शन देत अंकित मोहने हा फोटो शेअर केला आहे. या आधी सुद्धा अंकितने त्याच्या फिटनेसचे अनेक व्हिडिओ शेअर केले आहेत, आणि या व्हिडिओमधून त्याच्या सगळ्या चाहत्यांना त्याने फिटनेस टिप्स दिल्या आहेत. आणि नेहमीप्रमाणे अंकित मोहन आणि रुची सवर्णच्या या फोटोला त्यांच्या चाहत्यांनी लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव करत त्यांचे कौतुक केले आहे.