संपूर्ण महाराष्ट्राला पोट धरून हसवणाऱ्या चला हवा येऊ द्या मालिकेमधील सारेच कलाकार एकापेक्षा एक आहेत. त्यांच्या प्रत्येक ऍक्टमधून सगळ्या प्रेक्षकांच मनोरंजन करत, प्रेक्षकांना संपूर्ण दिवसाचा ताण सुद्धा विसरवायला लावतात. मालिकेमधील कलाकार हे, कॅमेरासमोर तर सगळ्यांना हसवून ठेवतात पण फावल्या वेळेमध्ये सुद्धा कल्ला करतात.  आणि या साऱ्यांचा कल्ला आपण सोशल मिडीयावर सुद्धा बघू शकतो. 

नुकतंच कुशल बद्रिके याने त्याच्या इंस्टाग्राम अकाउंटवर एक मजेशीर व्हिडिओ शेअर केला आहे. ज्यामध्ये त्याच्या सोबत भाऊ कदम सुद्धा आहे.कैमरा वुमन श्रेया बुगड़े सह भाऊ कदम आणि कुशल बद्रिके. असं कॅप्शन देत कुशलने हा व्हिडिओ पोस्ट केला आहे. ज्यामध्ये कुशल चक्क स्क्रीट शिजवत आहे. भाऊ कदमने, कुशलला विचारलेल्या प्रश्नाचं त्याने ‘स्क्रिप्ट शिजतंय...’असं उत्तर दिल आहे. आणि कुशलच्या याच खोडसर उत्तराला कंटाळून भाऊ सुद्धा त्याला वेड्यात काढत तिकडून निघून जातो. या आधी सुद्धा कुशलने, भाऊ कदम सोबत किंवा मग श्रेया सोबत मस्ती करतानाचे अनेक व्हिडिओ इंस्टाग्राम वर शेअर केले आहेत.  सारे प्रेक्षक सुद्धा त्यांच्या या व्हिडिओचं मनापासून कौतुक करत, त्यांच्या या वेडेपणाचा आनंद सुद्धा घेतात. आणि नेहमीप्रमाणे सगळ्या प्रेक्षकांनी कुशलच्या या व्हिडिओला चांगलाच प्रतिसाद दिला आहे.