माझा होशील ना मालिकेमधून आपल्या भेटीला आलेला, आदित्य म्हणजेच अभिनेता विराजास कुलकर्णी. माझा होशील ना मालिकेमध्ये आदित्य आणि सई हि जोडी प्रेक्षकांना भरपूर आवडत आहे. आणि यामागचं खरं आहे ते म्हणजे, मालिकेची कथा, कलाकारांचा अभिनय आणि मालिकेमध्ये दरवेळेला येणारे नवीन ट्विस्ट यासगळ्या मुळे खूप कमी वेळातच माझा होशील ना मालिका प्रेक्षकांच्या पसंतीस पडली. 

विराजस हा सोशल मिडियावर खूप चांगल्या पद्धतीने ऍक्टिव्ह असतो. आणि याच मिडियाचा वापर करत सेटवर सुरु असणारी त्याची आणि गौतमीची मस्ती असो किंवा मग कोणता एखादा बेहाइंड सिन्स या साऱ्यामुळे मालिकेमध्ये पुढे काय होणार आहे ? असे प्रश्न त्याच्या चाहत्यांना देऊन जातो. आणि नुकतंच विराजसने  इंस्टाग्राम अकाउंटवर, त्याच्या एका अवताराचा व्हिडिओ शेअर केला आहे. आणि त्याचा हा सारा अवतार सईला आनंदी करण्यासाठीचा असणार असून या अवताराचे नाव आहे टेडिया कश्यप. आणि याच टेडिया कश्यपचा मजेशीर व्हिडिओ आणि काही फोटो सुद्धा इंस्टाग्राम अकाउंटवर शेअर केले आहेत. टेडिया कश्यपच्या अवतारा आधीच व्हिडिओ आणि त्यानंतरचा व्हिडिओ, या दोन्ही व्हिडिओमधून विराजसची मेहनत आपण बघू शकतो. कारण या लुकसाठी मोठ्या प्रकारचा कॉस्ट्यूम विराजसला घालावा लागतो, आणि याचमुळे होणारी त्याची धडपड सुद्धा आपण बघु शकतो. नेहमीच सेटवरील काही गमतीदार व्हिडिओ प्रेक्षकांसमोर शेअर करत विराजस नेहमीच प्रेक्षकांच्या कौतुकाचा विषय बनला आहे. आणि यानंतर सुद्धा मालिकेमध्ये अजून काय नवीन आपल्याला बघायला मिळेल यामध्ये  खरी रंगत आहे.