आपला कसदार अभिनय, विनोदाचं अचूक टायमिंग, उत्तम डायलॉगबाजी आणि रंगभूमी सोबत जोडलं गेलेलं सुंदर नातं यासाऱ्या गोष्टीमधून तयार झालेले परिपक्व असे मराठी चित्रपट, नाटकं आणि मालकांमध्ये आपल्या कामाची आणि नावाची छाप सोडणारे मराठी अभिनेते भरत जाधव पुन्हा एकदा सगळ्या प्रेक्षकांचं मनोरंजन करायला तयार झाले आहेत. आणि पुन्हा एकदा प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यासाठी हा अभिनेता मालिका क्षेत्राकडे वळाला आहे.

मराठी अभिनेता भरत जाधव सुद्धा इतर कलाकारांप्रमाणे, सोशल मिडीयावर खूप चांगल्या पद्धतीने सक्रिय असतात. आणि दरवेळेला या मिडीयाचा वापर करत त्यांच्या चाहत्यांसाठी काही तरी नवीन घेऊन येत असतात. या साऱ्यामध्येच नुकतंच भरत जाधव यांनी त्यांच्या इंस्टाग्राम अकाउंटवर एक नवीन व्हिडिओ शेअर केला आहे. सांगितल होत ना की मी पुन्हा येईन..!! लवकरच.. दसऱ्याला भेटूया..असं कॅप्शन देत, भरत जाधव यांनी 'सुखी माणसाचा सदरा' या त्यांच्या आगामी मालिकेचा टिझर सगळ्या प्रेक्षकांसमोर शेअर करत पुन्हा एकदा भरत जाधव आपल्याला मालिकेमध्ये दिसून यातील हि बातमी सगळ्या चाहत्यांना दिली आहे. दिग्दर्शक केदार शिंदे यांनी सुद्धा काही दिवसांपूर्वी एका नवीन मालिकेचे संकेत सगळ्या प्रेक्षकांना दिले होते. आणि आता केदार शिंदे यांनी सुद्धा त्याच्या इंस्टाग्राम अकाउंटवर 'सुखी माणसाचा सदरा' या मालिकेचा टिझर शेअर केला आहे.  तूर्तास तरी दिग्दर्शक केदार शिंदे यांनी अभिनेता भरत जाधव यांची मुख्य भूमिका असलेल्या या मालिकेमध्ये अजून कोणते कलाकार आपल्याला बघायला मिळतील हे गुलदस्त्यात असले तरी, हि मालिका आपल्याला कलर्स मराठी वाहिनी वर बघायला मिळणार आहे. आणि भरत जाधव यांनी पुन्हा एकदा मालिकेमधून केलेल्या कमबॅक मुळे त्यांचा चाहता वर्ग नक्की सुखावला असेल यामध्ये काही वाद नाही.