मराठी चित्रपट आणि रंगभूमी वर आपली छाप सोडलेला अभिनेता, अमेय वाघ याने एक आनंदाची बातमी त्याच्या सगळ्या चाहत्यांना दिली आहे. आणि हि आनंदाची बातमी म्हणजे, लवकरचं अमेय वाघ याचा नवा कोरा चित्रपट आपल्या भेटीला येणार आहे.‘कारखानीसांची वारी’ असं या सिनेमाचं नाव आहे. आणि सिनेमाचं पोस्टर प्रदर्शित करण्यासोबतचं अजून एक आनंदाची बातमी अमेयने त्याच्या चाहत्यांसोबत शेअर केली आहे. 

या चित्रपटाबद्दल विशेष म्हणजे, कारखानीसांची वारी प्रदर्शित होण्याआधीच या चित्रपटाची निवड ३३ व्या टोकीयो इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हलसाठी झाली आहे. आणि याच गोष्टीचं निमित्त साधून, अमेय वाघ याने चित्रपटाचे पोस्टर शेअर केले आहे. ‘कारखानीसांची वारी- एशेस ऑन रोड ट्रिप’ असं या चित्रपटाचं नाव असून एकंदरीत हा चित्रपट ट्रिपला निघालेल्या एका कुटुंबावर आधारित असल्याचं कळून येत. अमेय वाघ सोबत या चित्रपटामध्ये मोहन आगाशे, वंदना गुप्ते, शुभांगी गोखले,  मृण्मयी देशपांडे, गीतांजली कुलकर्णी, प्रदीप जोशी यासारख्या कासदार कलाकार आपल्याला बघायला मिळणार आहेत. मंगेश जोशी यांनी या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं असून, अर्चना बोऱ्हाडे यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे. टोकीयो इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हलसाठी निवड झालेला हा चित्रपट लवकरचं प्रेक्षकांच्या भेटीला येईल, आणि सगळ्याचं प्रेक्षकांच मनोरंजन करेल यामध्ये काही वाद नाही.