मराठी बिग बॉस मधून आपल्या भेटीला आलेली सुंदर अभिनेत्री, सई लोकूर हिने नुकतंच तिच्या लाईफ पार्टनर सोबतच एक फोटो इंस्टाग्राम वर शेअर केला होता. परंतु हा फोटो पाठमोरा असल्यामुळे, सई लोकुरचा लाईफ पार्टनर  कोण आहे ? हा प्रश्न तिच्या सगळ्या चाहत्यांना पडला होता. आणि आता नुकतंच सई लोकूर हिने तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर वर अजून एक सुदंर असा फोटो शेअर केला आहे. 

सईने आज मेहंदी भरल्या हाताचा फोटो पोस्ट केला आहे. आणि तिचा हा लूक पाहून तिचे सारे चाहते हे अजून जास्त संभ्रमात पडले आहेत. आधी तिच्या लाईफ पार्टनर सोबतचा फोटो आणि त्याला साजेस असं,  I have every reason to believe that, matches are made in heaven. And I finally found mine... असं  प्रेमळ कॅप्शन आणि आता मेहंदी भरल्या हातासोबत, मुझे अपनी प्रीत विचं रंग दे, असं कॅप्शन देत हा फोटो शेअर केला आहे. सई लोकुरच्या या फोटोला तिच्या सगळ्या चाहत्यांसोबत, मराठी कलाकारांनी सुद्धा लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव करत तिचं अभिनंदन केले आहे. लवकरचं सई लोकूर सुद्धा तिच्या पार्टनरसोबतचा फोटो शेअर करत, तिने निवडलेला पार्टनर कोण आहे याची ओळख सगळयांना करून देईलच.