आपल्या दिग्दर्शकीय नजरेमधून प्रेक्षकांसमोर एकापेक्षा एक असे चित्रपट, नाटकं आणि मालिका घेऊन येणारे एक वास्तवादी दिग्दर्शक केदार शिंदे, पुन्हा एकदा प्रेक्षकांचं मनोरंजन करायला सज्ज झाला आहे. पण यावेळी मात्र केदार शिंदे हे त्यांच्या नव्या मालिकेमधून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 

आपल्या चित्रपटांमधून ते नाटकांपर्यंत प्रेक्षकांना काही तरी नवीन देण्याच्या धडपडीमध्ये असणाऱ्या दिग्दर्शकाने सगळ्या मराठी भाषिक प्रेक्षकांच्या मनावर राज्य केले आहे. मग त्यामध्ये अग्ग बाई अरेच्चा, जत्रा, गलगले निघाले यांसारखे गाजलेले चित्रपट असो किंवा सही रे सही, गेला उडत, लोच्या झाला रे यांसारखी नाटकं असो या सगळ्या माध्यमातून केदार शिंदे यांनी आपलं मनोरंजन केले आहे. फक्त चित्रपट आणि नाटकं नाही तर हसा चकीत फु पासून श्रीयुत गंगाधर टिपरे अश्या गाजलेल्या आणि आज सुद्धा प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणाऱ्या मालिका या दिग्दर्शकाने आपल्याला दिला आहेत. आणि आता पुन्हा एका केदार शिंदे आपल्यासाठी नवी मालिका घेऊन येत आहे. नुकतंच केदार शिंदे यांनी त्यांच्या इंस्टाग्राम अकाउंटवर, एक प्रोमो शेअर केला आहे. ज्यामध्ये आपण केदार शिंदे यांना, "माझी माणसं भेटीला घेऊन येत आहे" असं म्हणत प्रेक्षकांची उत्सुकता वाढवली आहे. सध्या तरी हि मालिका कोणत्या विषयावर आधारित आहे किंवा याच शीर्षक काय असेल आणि कोणते कलाकार या मालिकेमध्ये बघायला मिळणार आहे हे सार काही गुलदस्त्यात आहे. परंतु केदार शिंदे यांची येणारी मालिका हि कलर्स मराठी वाहिनी वर बघायला मिळेल हे पक्क आहे. आणि दरवेळे प्रमाणे केदार शिंदे यांची हि कलाकृती सुद्धा प्रेक्षकांचं  भरपूर मनोरंजन करेल यामध्ये काही वाद नाही.