रात्रीस खेळ चाले या मालिकेच्या समाप्ती नंतर सुद्धा, मालिकेमधील मुख्य कलाकार शेवंता म्हणजेच अभिनेत्री अपूर्वा नेमळेकर आज सुद्धा प्रेक्षकांच्या मनावर राज्य करत आहे. आपला दमदार अभिनय आणि सुंदर असे रूप या सगळ्याच्या जोरावर अभिनेत्री अपूर्वा नेमळेकर हिने खूप कमी वेळातच तिचा एक चाहता वर्ग बनला. परंतु आता जरी हि मालिका बंद  झाली असली तरी सुद्धा अपूर्वा सोशल मिडीयाच्या मार्फत तिचं चाहत्यांसोबत जोडलेली असते. लाईव्ह जात तर कधी तिने केलेले फोटोशूट यामुळेंच अपूर्व आज सुद्धा सगळ्या प्रेक्षकांच्या चर्चेचा विषय बनली आहे. 

शेवंता साकारून समस्त मराठी प्रेक्षकांच्या मनात घर करणारी अपूर्वा नेमळेकर सोशल मिडीयावर खूप चांगल्या पद्धतीने सक्रिय आहे. आणि याच सोशल मिडीयावर एकापेक्षा एक सुंदर आणि घायाळ करणारे फोटोज शेअर करत, अपूर्वा नेहमीच तिच्या चाहत्यांचं लक्ष वेधून घेते.  नुकतंच अपूर्वाने लाल रंगाच्या साडीमध्ये एक फोटोशूट केले आहे. आणि या फोटोशूटचे काही फोटोज तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर शेअर करत पुन्हा एकदा तिच्या चाहत्यांना घायाळ केले आहे. या आधी सुद्धा अपूर्वाने वेस्टर्न आऊटफिटचे फोटोशूट, शेअर करत सगळ्या प्रेक्षकांचं कौतुक मिळवलं आहे. परंतु अपूर्व नेमळेकरचं खरं रूप हे साडीमधून निखळून येतं. आणि म्हणूनच खूप कमी वेळातच अपूर्वाच्या या फोटोशूटवर तिच्या चाहत्यांनी लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे. सध्या तरी अपूर्वा नेमळेकरचे अजून नवीन कोणते प्रोजेक्ट्स येतील यावर तरी प्रश्नचिन्ह आहे, परंतु अपूर्वा नेमळेकर तिच्या सगळ्या प्रोजेक्ट्समधून प्रेक्षकांचं भरपूर ,मनोरंजन करेल यामध्ये काही वाद नाही.