मराठी मालिका आणि नाटकांमध्ये आपल्या कामाची छाप सोडणारा अभिनेता सुयश टिळक आता, आपल्याला हिंदी चित्रपटामध्ये सुद्धा दिसणार आहे. मकबूल खान दिग्दर्शित, 'खालीपिली' या हिंदी चित्रपटामधून सुयश आपल्या भेटीला येणार आहे. 

अभिनेता सुयश टिळक याने त्याच्या इंस्टाग्राम अकाउंटवर या चित्रपटाच्या शुटिंगचे काही पोट शेअर करत, त्याच्या चाहत्यानां हि बातमी दिली आहे. मकबूल खान दिग्दर्शित,  इशान खट्टर आणि अनन्या पांडे यांची मुख्य भूमिका असणाऱ्या 'खालीपिली' या चित्रपटामध्ये सुयश टिळक मंग्या नावाची भूमिका साकारत आहे. त्याच्या इंस्टाग्राम अकाउंटवरून सुयशने चित्रपटाचे दिग्दर्शक मकबूल खान ज्यांनी त्याला या चित्रपटामध्ये काम करण्याची संधी दिली आणि चित्रपटाचे डीओपी अदिल अफसर ज्यांनी त्यांच्या कॅमेरामधून मंग्या साकारला, या दोघांचे मनपूर्वक आभार मानले आहेत. मराठी मालिकांमध्ये काम करणारा हा चार्मिंग फेस अभिनेता, आता त्याच्या अभिनयाची जादू हिंदी चित्रपटामध्ये दाखवणार आहे. आणि येत्या २ ऑक्टोबरला झी फ्लेक्स या ओटीटी प्लॅटफॉर्म वर मकबूल खान दिग्दर्शित, खालीपिली हा चित्रपट आपल्याला बघता येणार असून, सध्या सुयश टिळक कलर्स मराठी वाहिनी वरील, शुभमंगल ऑनलाईन या मालिकेमध्ये सायली संजीव सोबत मुख्य भूमिकेमध्ये दिसणार आहे.