विनोदाची अस्सल जाणं असणारा आणि आपल्या अचूक टायमिंगने 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' या मालिकेमधून संपूर्ण महाराष्ट्राला हसवून ठेवणारा अभिनेता म्हणेजच समीर चौघुले. महाराष्ट्राची हास्यजत्रा मालिकेमधून आपल्या समोर आलेला हा विनोदाचा बादशाहा त्याच्या कसलेल्या अभिनयामधून आपल्या सगळ्यांचे मनोरंजन करतो. आणि त्याच्या याच वृत्तीमुळे समीरने त्याच्या स्वतःचा एक वेगळा चाहता वर्ग सुद्धा तयार केला आहे. 

आणि आता मराठीमधील हाच विनोदवीर, आपल्या अभिनयाची जादू हिंदी चित्रपटामध्ये सुद्धा दाखवणार आहे. मराठी चित्रपट, मालिका आणि नाटकांमधून स्वतःला सिद्ध करणारा समीर आता आपल्याला हिंदी चित्रपटामध्ये दिसणार आहे. आणि याची बातमी समीरने स्वतः त्याच्या इंस्टाग्राम अकाउंटवर एक पोस्ट शेअर करून सगळ्या प्रेक्षकांना दिली आहे. गुल्लु शादी मुबारक या हिंदी सिनेमात समीर चौगुले झळकणार असून, त्याचा हा पहिला हिंदी चित्रपट असणार आहे. समीरने  त्याच्या पोस्टमध्ये, हिंदी चित्रपटांमधील कसदार अभिनेते अतुल श्रीवास्तवा यांच्या सोबत फोटो शेअर केला आहे. महाराष्ट्राची हास्यजत्रा मधून, विशाखा आणि समीरची जोडी नेहमीच प्रेक्षकांसाठी एक आकर्षणाचा विषय बनली आहे. कारण या दोघांच्या विनोदाचं अचूक टायमिंग आणि त्याच्याच जोडीला असणार समीरचं लेखन या गोष्टींमुळे समीर चौघुले या कलाकाराने सगळ्या प्रेक्षकांच्या मनात त्याची एक वेगळी जागा बनवली आहे. आणि आता हाच कलाकार हिंदी भाषिक प्रेक्षकांची सुद्धा मने जिंकेल यामध्ये सुद्धा काही वाद नाही.