चित्रपट, नाटकं आणि मालिका या तिन्ही क्षेत्रामध्ये आपल्या नावाचा बोलबाला करणारा, आपल्या सगळ्यांचा लाडका अभिनेता म्हणजेच सुबोध भावे. आपल्या अभिनयामधून सगळ्या प्रेक्षकांना खिळवून ठेवणारा, आपल्या उत्त्मोउत्तम भूमिकेमधून दरवेळेला काही तरी नवीन सादर करणारा हा अभिनेता, नेहमीचं त्याच्या चाहत्यांसाठी काही तरी नवीन घेऊन येत असतो. मग त्यामध्ये रंगभूमी वरील नाटकं असो, मराठी चित्रपट असो किंवा मालिका या सगळ्यांमधून मनोरंजन करत, सुबोध भावे याने सगळ्यांची मने जिंकली आहेत. 

आणि आता हाच वास्तववादी अभिनेता पुन्हा एकदा प्रेक्षकांचं मनोरंजन करायला सज्ज झाला आहे. नुकतंच अभिनेता सुबोध भावे याने त्याच्या इंस्टाग्राम अकाउंटवर त्याच्या येणाऱ्या नवीन मालिकेचा टिझर शेअर केला आहे. झी मराठी वाहिनी वरील गाजलेली मालिका तुला पाहते रे, नंतर सुबोध आता त्याची नवी मालिका 'चंद्र आहे साक्षीला' मधून आपल्या भेटीला येणार आहे. मालिकांशी जोडलेली नाळ कधी तुटली नाही, पुन्हा एका नव्या रुपात तुमच्या समोर येतोय, असं कॅप्शन देत, सुबोधने हा टिझर प्रेक्षकांसाठी शेअर केला आहे. या टिझर मधून आपण सुबोधचा, कॉमन मॅन असा लूक बघू शकतो. कलर्स मराठी वाहिनीवर हि मालिका आपल्या भेटीला येणार असून, तूर्तास तरी या मालिकेमध्ये अजून कोणते कलाकार आपल्याला बघायला मिळणार आहे हे मात्र गुलदस्त्यात आहे. परंतु या मालिकेमधून आपल्या समोर सुबोध भावेची एक नवीन भूमिका आणि एक दमदार अभिनय बघायला मिळेल एवढं मात्र नक्की.