मराठी चित्रपट सृष्टीमधील डॅशिंग आणि कुल आई बाबा म्हणून कोणत्या कलाकारांची ओळख करायची असेल तर,  उर्मिला कोठारे आणि आदिनाथ कोठारे या जोडीचं नाव हे नेहमीच पहिल्या स्थानावर असेल. कारण जिजा सोबत चालणारी या दोघांची मज्जा मस्ती हे सारं काही त्याचें चाहते बघू शकतात. आणि याचमुळे कि काय बाप लेक किंवा मायकेलीची हि जोडी नेहमी प्रेक्षकांच्या पसंतीस उतरते. 

नुकतंच उर्मिला कोठारे हिने जिजा सोबतचा अजून एक व्हिडिओ तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर शेअर केला आहे. ज्यामध्ये जिजा, आदिनाथ आणि स्वतः उर्मिला हे तिघेजण पाण्यामध्ये पाहण्याचा आनंद लुटत आहेत. आणि या व्हिडीओमध्ये जिजा सुद्धा त्या दोघांसोबत पाण्याची पोहण्याची मज्जा घेत आहे. या सगळ्यामध्ये एक बाब उभारून आली आणि ती म्हणजे, उर्मिलाने या व्हिडिओ साठी दिलेलं कॅप्शन, ज्यामध्ये उर्मिलाने जिजा साठी एक छोटंस पत्र लिहिलं आहे. आम्ही तुझ्यावर खूप प्रेम करतो हे कधीही विसरू नकोस, आणि जीवन कठीण आणि चांगल्या काळाने भरलेले असत, आणि यामधूनच आपण सार काही शिकलं पाहिजे. असा मूलमंत्र उर्मिलाने, जिजासाठी दिला आहे. याआधी सुद्धा उर्मिला आणि आदिनाथ या दोघांनी जिजा सोबतचे अनेक फोटो आणि अनेक व्हिडिओ आपल्यासोबत शेअर केल्या आहेत. मग त्यामध्ये #जिजाआणिडॅडा या दोघांचा संवाद असुदे किंवा मग उर्मिला सोबतचे तिचे फोटोज, उर्मिला आणि आदिनाथचे चाहते हे नेहमीच जिजाचं कौतुक करत असतात. आणि यावेळी सुद्धा प्रेक्षकांनी या कोठारे कुटूंबाचं कौतुक करत जिजाच्या या व्हिडिओवर लाईक्सचा वर्षाव केला आहे.