सध्या आपले मराठी कलाकार हे सोशल मिडीयावर खूप जास्त पद्धतीने सक्रिय आहेत. आणि याच सोशल मिडीयाचा वापर करत हे कलाकार अनेकवेळा त्यांच्या चाहत्यांसोबत संवाद साधत त्यांच्या सोबत जोडलेले असतात. आणि प्रेक्षकंसुद्धा नेहमीच सोशल मिडियामार्फत त्याच्या आवडत्या कलाकारांचं सध्या काय सुरु  आहे ? याची माहिती घेत असतात. 

मराठी चित्रपटसृष्टीमधील कलाकार सुबोध भावे हा नेहमीच त्याच्या इंस्टाग्राम आणि फेसबुक अकाउंटवर खूप जास्त पद्धतीने सक्रिय असतो. आणि सुबोध नेहमीच या सोशल मिडियाचा वापर करत त्यांच्या चाहत्यांसमोर काही तरी नवीन सादर करत असतो. मग त्यामध्ये त्याचं स्वतःच सुबोध दादाची गोष्ट याचा भाग असो किंवा त्याचे  येणारे नवीन प्रोजेक्ट्स या सगळ्याची माहिती सुबोधच्या सोशल अकाउंटवरून आपल्याला मिळते. नुकतंच सुबोध भावे याने, बालपणीचा फोटो शेअर करत एक गोड अशी आठवण शेअर केली आहे. आणि या फोटोच महत्व हे त्याच्या कॅप्शनवरून आपल्याला कळू शकते. या कॅप्शनमध्ये सुबोध भावे याने तो तीन वर्षाचा असतानाची एक गोष्ट आपल्यासमोर मांडली आहे, ज्यामध्ये तो तीन वर्षाचा असताना पुणे मध्ये पोरवाल सायकल मार्ट, सारसबाग इथे तीन चाकी सायकलची स्पर्धा झाली होती, आणि या स्पर्धेमध्ये सुबोधने पहिला क्रमांक पटकावला होता आणि या स्पर्धेमध्ये त्याला सायकल बक्षीस म्हणून मिळाली होती. अशी सुबोधचे सुंदर आठवण त्याने इंस्टाग्राम वर शेअर केली आहे. याआधी सुद्धा अनेक वेळा सुबोध भावे याने, त्याच्या कॉलेजच्या दिवसांमधील किंवा त्याच्या चित्रपटांमधील आठवणी सोशल मिडीयावर शेअर केल्या आहेत. आणि दरवळे प्रमाणे सुबोधच्या या फोटोवर सुद्धा त्याच्या चाहत्यांनी कौतुकाचा आणि लाईक्सचा वर्षाव केला आहे.