बिग बॉस मराठी सीजन एक मधून आपल्या भेटीला आलेली सुदंर अभिनेत्री सई लोकूरने, तिचा एक वेगळा चाहता वर्ग तयार केला आहे. आपल्या हसमुख स्वभावाने आणि सौंदर्याने सगळ्या प्रेक्षकांना सईने भुरळ पाडली आहे.  लॉकडाउनच्या सईने घरामध्येच राहून सोशल मिडियामार्फत सई लोकुरने तिच्या चाहत्यांचे भरपूर मनोरंजन केले. कधी तिच्या डान्स व्हिडिओने तर कधी तिच्या ऍक्टिंग वर्कशॉपने, सई हि नेहमीच प्रेक्षकांच्या चर्चेचा विषय बनली आहे. 

आणि आता सुद्धा सई लोकूर अश्याच एका गोष्टींमुळे तिच्या चाहत्यांच्या चर्चेचा विषय बनली आहे. आणि तो विषय म्हणजे सई लोकुर हिने तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर  शेअर केलेला फोटो आणि त्यासाठी असणार कॅप्शन, नुकतंच सईने  तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर एक फोटो शेअर केला आहे. परंतु हा फोटो मात्र पाठमोरा असून, त्यासाठी असणारं कॅप्शन हे खुपचं भारी आणि सगळ्यांना थक्क करणार असं आहे. या फोटोसाठी सईने, I have every reason to believe that, matches are made in heaven. And I finally found mine... असं  प्रेमळ कॅप्शन दिल आहे. आणि तिच्या या कॅप्शनवरून सगळ्यांना कळून येत कि, हा फोटो सईच्या होणाऱ्या नवऱ्याचा आहे. सई सोशल मिडीयावर खूप चांगल्या पद्धतीने सक्रिय असते, आणि याच सोशल मिडीयाचा वापर करत ती, तिच्या नवीन प्रोजेक्ट बद्दल आणि तिच्या दिनक्रमाबद्दल आपल्याला अपडेट देत असते. आणि याच मिडीयाचा वापर करत, सईने हि आनंदाची बातमी आपल्या सोबत शेअर केली आहे. तूर्तास तरी या फोटो वरून सईच्या लाईफ पार्टनरचा चेहरा तर आपण बघू शकत नाही, परंतु लवकरचं सई स्वतः त्यांच्या दोघांचा फोटो शेअर करत, तिचा हा मिस्ट्रीमॅन कोण आहे ? याची बातमी आपल्याला देईलच.