मराठी चित्रपटसृष्टी ते हिंदी पर्यंत आपल्या नावाचा बोलबाला करणारी अभिनेत्री अमृता खानविलकर हिने आपल्या अभिनयाने फक्त मराठीचं नाही तर हिंदी भाषिक प्रेक्षकांना सुद्धा भूरळ पाडली आहे. हिंदी चित्रपटाचं नाही तर, खतरों के खिलाडी यासारख्या बहुचर्चित अश्या हिंदी गेम शो मध्ये सुद्धा अमृताने आपला ठसा उमटवला. आणि याचं कारणांमुळे अमृता नेहमीच चर्चेत सुद्धा राहिली आहे. 

आणि हीच सौंदर्यवती आज सुद्धा अजून एका कारणांमुळे तिच्या चाहत्यांच्या चर्चेचा विषय बनली आहे. आणि तो विषय म्हणजे तिने केलेलं फोटोशूट, अमृता खानविलकरने नुकतंच तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर, तिने केलेल्या फोटोशूटचे काही फोटोस शेअर केले आहेत. अमृता नेहमीच तिच्या ग्लॅमरस आणि हटके फोटोशूटमधून प्रेक्षकांची मने जिंकते. आणि आता सुद्धा तिच्या फोटोशूटने सगळ्या प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. आणि यावेळीच्या फोटोशूटमधील एक नाविन्यपूर्ण गोष्ट म्हणजे, अमृताचं हे फोटोशूट ग्लॅमरस किंवा वेस्टर्न आऊटफिट मधलं नसून, सफेद रंगांच्या कॉटन कुर्ताच्या आऊटफिटवर हे फोटशूट केले आहे. आणि तिच्या वेस्टर्न आऊटफिट फोटोशूटपेक्षा अमृताच्या या साध्या आणि सुंदर फोटोशूटचे तिच्या चाहत्यांनाही कौतुक केले आहे. अमृता नेहमी तिच्या लुकला घेऊन विविध प्रकारचे प्रयोग करताना दिसते, आणि यावेळी सुद्धा तिने अश्याच लूकवर फोटोशूट केलं आहे. अमृताच्या फोटोशूटवर तिच्या चाहत्यांनी भरपूर प्रेम केलं आहे आणि आत्ता सुद्धा या फोटोशूवर सगळ्यांचं प्रेक्षकांनी कौतुकाचा वर्षाव केला आहे.