लॉकडाऊनमध्ये अनेक कलाकारांनी त्यांच्या आवडीनिवडी जोपासत, अभिनयापासून थोडा वेळ सुट्टी घेत त्यांचे छंद जोपासले. मग त्यामध्ये कोणत्या कलाकारांनी योगासनाचे धडे आपल्याला दिले तर काहींनी कुकींगचे स्किल्स आपल्यासमोर सादर केले. आणि याच कलाकारांमध्ये त्याच्या विनोदीवृत्तीने आपल्याला हसवत ठेवणाऱ्या कलाकाराने त्याची चित्रकलेची आवड आपल्यासमोर सादर केली. आणि असा हा कलाकार हरहुन्नरी कलाकार म्हणजे अभिनेता वैभव मांगले. 

वैभव मांगलेची चित्रकला हि लॉकडाउनच्या काळामध्ये, सोशल मिडियामार्फत सगळ्या प्रेक्षकांसमोर आली. आणि त्यांच्या चाहत्यांपासून अनेक मराठी कलाकारांनी वैभव मंगलेच्या चित्रकलेचे कौतुक सुद्धा केले. परंतु वैभवाने हि चित्र एक छंद म्हणून मर्यादित न ठेवता. त्यांनी हि चित्रे विकण्याचा निर्णय घेतला आहे. नुकतंच मराठी अभिनेता सुबोध भावे याने वैभव मांगलेंकडून एक चित्र विकत घेतलं आहे. आणि त्यासोबतचं एक पोस्ट सुद्धा लिहिली आहे. ज्यामध्ये सुबोधने, वैभव मांगलेचे कौतुक करत, त्यांनी हि काढलेली चित्र विकल्यानंतर जे पैसे वैभवला मिळाले ते पैसे त्याने, चित्रपट आणि नाटकं क्षेत्रामधील काम करणाऱ्या गरजू व्यक्तींसाठी वापर केला आहे. असं सांगितलं आहे. पण याबरोबर अजून एक बाब लक्षात घेण्यासारखी आहे, आणि ती म्हणजे वैभव मांगलेने सुद्धा त्याच्या इंस्टाग्राम अकाउंटवर सुबोधचे आभार मानले आहेत. सुबोध भावेंच्या माणुसकीचे सुद्धा कौतुक केले आहे. ज्यामध्ये वैभव मांगले यांनी, सुबोध भावेनी १० वर्षाआधी सोबत काम केलेल्या एका इव्हेंटचे पैसे आता देऊ केले आहेत. सुबोधने फक्त वैभव मांगलेचेच पैसे नाही तर त्या इव्हेंटमध्ये काम करणाऱ्या इतर व्यक्तींना सुद्धा त्यांचे पैसे दिले आहेत. आणि याच गोष्टीचं कौतुक वैभवने त्यांच्या पोस्ट द्वारे केलं आहे. कलाकार हा कितीही मोठा झाला तरी सुद्धा त्याची समाजासाठी असणारी ओढ आणि त्याची माणुसकी हेच सगळ्यात महत्वाची अशी असते. आणि याच उत्तम उदाहरण आपण वैभव मांगलेच्या पोस्ट वरून बघू शकतो.