सध्या सोशल मिडीयावर अनेक चॅलेंजेस सुरु आहेत ज्यामध्ये सिंगल चॅलेंज, साडी चॅलेंज, बापलेक चॅलेंज, स्टे हॅपी चॅलेंज यांसारख्या अनेक चॅलेंजनी अक्षरशः धुमाकूळ घातला आहे. आणि सध्याच्या परिस्तिथीमधून वेळ काढतं स्वतःचा विरंगुळा म्हणून सारेजण हे चॅलेंजस स्वीकारत इतरांना सुद्धा यामध्ये सहभागी करत आहेत. 

आणि याच चॅलेंजेसकडे वेगळ्या दृष्टीकोनातून बघत, मराठी चित्रपटसृष्टीमधील एका कलाकाराने, प्रकाश साधनां बाबा आमटे आणि मंदाकिनी देशपांडे आमटे यांचा फोटो शेअर करत, माझं #idolcouplechallenge, पूर्ण केलं आहे. आणि हे बनात चॅलेंज पूर्ण करणारा अभिनेता म्हणजे संतोष जुवेकर. संतोष हा नेहमीच सोशल मिडीयावर खूप चांगल्या पद्धतीने सक्रिय असतो. फक्त अभिनयचं नाही तर, सामाजिक गोष्टींकड़े बघण्याचा त्याचा दृष्टिकोन सुद्धा खूपच निराळा असा असतो. आणि इंस्टाग्राम मार्फत संतोष, अनेक विषयांवर हस्यात्मक रित्या भाष्य सुद्धा करतो.  आणि आता सोशल मिडियावर सुरु असणाऱ्या या चेलेंजमध्ये भाग घेत, संतोषने प्रकाश साधनां बाबा आमटे आणि मंदाकिनी देशपांडे आमटे या दोघांचा फोटो शेअर करत, त्यांना एक आयडल कपल म्हणून संबोधलं आहे. संतोष जुवेकरच्या या आगळ्या वेगळ्या चेलेंजमुळे त्याच्या चाहत्यांनी त्याचे भरपूर मनोरंजन केले आहे. आणि त्याच्या या फोटोवर सुद्धा लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होत आहे.