मराठी नाटक आणि चित्रपटसृष्टीमधील एक नामवंत कलाकार डॉ. काशिनाथ घाणेकर यांच्या जीवनपटावर आधारित, २०१८ मध्ये प्रदर्शित झालेला सुबोध भावे यांची मुख्य भूमिका असलेला  'आणि डॉ. काशिनाथ घाणेकर' या सिनेमाला प्रेक्षकांची आज सुद्धा भरभरून पसंती मिळत आहे. या चित्रपटाने सिनेमागृह तर भरून काढलीच पण आज सुद्धा प्रेक्षक ओटीटी प्लॅटफॉर्म आणि टेलिव्हिजन वर या चित्रपटाचा आनंद घेतात. 

'आणि डॉ. काशिनाथ घाणेकर' या चित्रपटाने अनेक पुरस्कार स्वतःच्या नावावर केले. अनेक कलाकारांनी या चित्रपटाचे कौतुक सुद्धा केले. नुकतंच चित्रपटामधील कलाकारांनी एक इंस्टाग्राम अकाउंटवर शेअर केली आहे. ज्यामध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेना या पक्षाचे अध्यक्ष मा. राज ठाकरे यांचे आभार मानले आहे. आणि यामागचा हेतू म्हणजे, राज ठाकरे यांनी पहिल्यांदाच  'आणि डॉ. काशिनाथ घाणेकर', हा चित्रपट पाहिला आणि त्या बदल्यात या चित्रपटामधील कलाकारांपासून सगळ्यांचेच कौतुक केले आहे. सिनेमात दाखवलेला काळ मराठी रंगभूमीचा सुवर्णकाळ होता, कोरोनोत्तर काळात पुन्हा मराठी रंगभूमी अशीच बहरू दे... आणि... नटांच्या, संहितेच्या जोरावर तसंच सिनेमात म्हटल्याप्रमाणे नाट्यवेड्या मराठी माणसाच्या प्रतिसादावर पुन्हा नाट्यगृहाच्या बाहेर 'हाऊसफुल्ल'चे फलक कायमचे लागू देत." अश्या सुंदर शब्दांत कौतुक करत राज ठाकरे यांनी, सुबोध भावे, प्रसाद ओक, सुमित राघवन यांसोबत इतर कलाकारांचे सुद्धा आभार मानले आहे. राज ठाकरे हे नेहमीच मराठी चित्रपटांच्या आणि मराठी कलाकारांच्या मागे एका आधारस्तंभासारखे उभे असतात. आणि यामधूनच त्यांची मराठी चित्रपट आणि नाटकांसाठी असणारी ओढ आपल्याला दिसून येते.