आपल्या खुमासदार अभिनयाने सगळ्यांना भुरळ पाडणारा, आणि मराठी चित्रपटसृष्टीमधील एनर्जी मॅन म्हणून ओळखला जाणारा आपल्या सगळ्यांचा लाडका सिद्धू, म्हणजेच अभिनेता सिद्धार्थ जाधव, याने सुद्धा त्याच्या अभिनय क्षेत्राची सुरवात हि नाटकांपासूनच केली होती. आणि म्हणूनच आज सुद्धा या रंगमंचाच्या कलाकारांची नाळ हि रंगभूमी सोबत जोडली गेली आहे.
आणि याचंच एक उत्तम उदाहरणं हे आपण, सिद्धार्थच्या इंस्टाग्राम पोस्ट वरून आपण बघू शकतो. २३ सप्टेंबर रोजी संपूर्ण मुंबईला पावसाइन झोडपले, आणि यामुळे समस्त मुंबई सोबत, परेल येतील दामोदर नाट्यगुह सुद्धा पाण्याखाली गेले. आणि याच नाट्यगृहाची आठवण म्हणून सिद्धार्थ जाधव याने एक भावनिक पोस्ट शेअर केली आहे. शाळेच्या गॅदरिंगपासून ज्या स्टेजवर उभा राहयला शिकलो, नाटकं पाहीली, भरलेल्या प्रेक्षकांच्या साथीनं प्रयोग केले, त्या दामोदर नाट्यगृहाचे (परेल) असे फोटो पाहून ढसाढसा रडावसं वाटतंय, भरून आलंय...२०२० चा हा संकटकाळ अधिक कठीण होतोय ते पाहवत नाही. सर्वांसाठी प्रार्थना...काळजी घ्या, असं भावनिक कॅप्शन देत सिद्धार्थने त्याचं रंगभूमी सोबत असणार नातं आणि त्याबद्दल वाटणारी उणीव आपल्या सगळ्यांसमोर सादर केली आहे. नाटकांमधून सुरवात केलेल्या सिद्धार्थची नाळ अजून सुद्धा नाटकांसोबत बांधली गेली आहे. आणि त्याबद्दल तेवढीच कळवळा सुद्धा आहे. हे आपण सिद्धार्थ जाधवच्या या पोस्ट वरून बघू शकतो.