आपल्या अभिनयातून सगळ्यांना थक्क करणारा, उत्तम संवादफेक, विनोदीवृत्ती आणि तेवढाच हजारजवाबी पणा या सगळ्या गोष्टींमुळे जितेंद्र जोशी या अभिनेत्याने फक्त मराठीच नाही तर हिंदी भाषिक प्रेक्षकांना सुद्धा आपल्याकडे आकर्षित केले. सेक्रेड गेम सारखी गाजलेल्या वेबसिरींजमधील काटेकर असो किंवा, माउली चित्रपटामध्ये नाना लोंढे हा खलनायक, जितेंद्र जोशी हा नेहमीच त्याच्या चाहत्यांना काही तरी नवीन देत असतो. 

याच धडपडीमध्ये असणाऱ्या कलाकार आता निर्मिती क्षेत्राकडे वळला आहे. म्हणजे जितेंद्र जोशी आता आपल्यासमोर एक निर्माता म्हणून येणार आहे. नुकतंच जितेंद्र जोशी याने त्यांच्या इंस्टाग्राम अकाउंटवर, त्याचा येणार चित्रपट गोदावरी चं पोस्टर पोस्ट केलं आहे. आणि यामधून हा कलाकार आपल्याला अभिनय करताना तर दिसणार आहेच. पण त्याच जोडीला निर्माता जितेंद्र जीशी अशी नवीन बाजू आपल्या बघायला मिळणार आहे. 2 डिसेंबर 1997 रोजी काही स्वप्नं घेऊन मी मुंबई मध्ये दाखल झालो. गेल्या 23 वर्षात मला या शहराने आणि इथल्या माणसांनी भरभरून प्रेम दिलं, शहाणं केलं.  आज एक पाऊल पुढे टाकत मी माझ्या मित्रांसोबत आमचा पहिला चित्रपट निर्माण करायचं धाडस करतोय. अशी भावनिक कॅप्शन देत जितेंद्र जोशीने या चित्रपटाची घोषणा केली आहे. निखिल महाजन दिग्दर्शित या चित्रपटामध्ये, जितेंद्र जोशी सोबत  प्रियदर्शन जाधव, सखी गोखले, नीना कुलकर्णी, गौरी नलावडे आणि संजय मोने हे कलाकार सुद्धा आहेत.