प्रसिद्ध शास्त्रीय संगीतकार राहुल देशपांडे आणि त्यांची मुलगी रेणुका हि बापलेकीची जोडी सगळ्यांच्या चर्चेचा विषय बनली आहे. फक्त आपल्या गायनामधून नाही तर, एक वडिलांच्या नात्याने सुद्धा राहुल देशपांडे याने सगळ्या प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. राहुल नेहमीच रेणुकाचे काही गंमतीदार व्हिडिओ इंस्टाग्राम अकाउंटवर शेअर करत असतो. मग त्यामध्ये बाप लेकीची सुरु असणारी धम्माल मस्ती असो किंवा, मग रेणुकाचे गाणे त्यांच्या या व्हिडिओच सारेजण भरपूर कौतुक करतात. 

अश्याच व्हिडिओ मध्ये अजून एका व्हिडिओची भर पडली आहे. नुकतंच राहुल देशपांडेने रेणुकाचा एक व्हिडिओत्याच्या इंस्टाग्राम आणि फेसबुक अकाउंटवर  शेअर केला आहे. ज्यामध्ये रेणुका तिच्या आई सोबत म्हणजेच नेहा सोबत पावसाचा आनंद घेत आहे. या व्हिडिओ मध्ये घराबाहेर पडणारा पाऊस आणि त्याच्या जोडीला, राहुलच्या आवाजत सुरु असलेले, झुकी आयी रे बदरिया सावन की... या गाण्याच्या जोडीला मायलेकी सुद्धा पाऊस एन्जॉय करत आहेत. आपल्या आवाजाने सगळ्या प्रेक्षकांना मंत्रमुग्ध करणारा हा गायक, आपल्या मुलीसोबत मात्र तिच्याच एवढा होऊन जातो. आणि बाप लेकीची हि जोडीने सुद्धा अनेक वेळा प्रेक्षकांचे भरपूर मनोरंजन केले आहे.