आई आणि मुलगी हे एक असं नातं आहे जे खूप नाजूक आहे आणि बघायला गेलं तर खूप मजबूत हि. ह्याच नात्यावर आधारित माधुरी हा चित्रपट आपल्या भेटीला आला आहे. एका ठराविक वयात आल्यानंतर आपण आपल्या पालकांशी स्वतःच्या स्वातंत्र्यासाठी भांडतो त्यांच्यावर चिडतो आपण त्यांना समजून घायला किव्हा ते आपल्याला समजून घ्यायला कुठेतरी कमी पडतात असं जाणवू लागतं. आजच्या जगात आपण आपल्या पालकांसोबत किती वेळ घालवतो त्यांना किती समजून घेतो त्यांच्याशी किती प्रेमाने बोलतो..? आणि जेव्हा आपल्यांमधले गैरसमज दूर होतात तेव्हा आपण त्यांना जवळ घेऊन सॉरी म्हणतो का..? हे सर्व म्हणजे माधुरी चित्रपट.

माधुरी प्रधान पाचगणीत एक शिक्षिका आणि तिची बंडखोर मुलगी काव्या प्रधान. कठोर आणि शिस्तबद्ध असलेल्या आपल्या आईला कंटाळून काव्या एका दिवसासाठी घर सोडून जाते मग तिच्या काळजीने चुकीच्या गोळ्या घेऊन माधुरी प्रधान ला ब्रेनहॅमरेज होऊन तिला Retrograde Amnesia हा आजार जडतो. ह्या आजारात माधुरी तिच्या आयुष्यातील मागची २० वर्ष साफ विसरून जाते आणि ९० च्या दशकातील माधुरी बनून वावरू लागते आणि मग पुढे ती यातून बाहेर येते कि नाही हे जाणून घेण्यासाठी तुम्हाला हा चित्रपट पाहावा लागेल. आयुष्यात परिस्थिती वाईट असली की आपण दुःखी होतो पण याचा अर्थ असा नाही की आपण हसणं विसरतो. आयुष्यात असे काही phasases येतात पण आपण आयुष्य मात्र जगत राहतो हा संदेश ह्या चित्रपटात देण्यात आला आहे.

शरद केळकर ह्या चित्रपटात सायकियाट्रिस्ट च्या भूमिकेत दिसतो परंतु शरदची भूमिका जास्त वेळ पडद्यावर दिसत नाही. माधुरीच्या मित्राच्या भूमिकेत असलेला सुबोध देखील अगदी थोड्या वेळासाठी आपल्याला दिसतो. हा चित्रपट माधुरी, काव्या,रोहन आणि अमर ह्या चार पात्रांभोवती फिरताना दिसतो. नेहमीप्रमाणे सोनाली कुलकर्णी ने ह्या चित्रपटात आपल्या अभिनयाची छाप सोडली आहे.

विशीतील माधुरी आणि आई ची भूमिका साकारलेली माधुरी सोनाली कुलकर्णी ने अगदी उत्तम केली आहे. पहिलाच चित्रपट आणि चित्रपटात असलेली महत्वाची भूमिका संहिता ने बऱ्यापैकी झेलली आहे. रोहन म्हणजे अक्षय केळकर आणि अमर म्हणजे विराजस कुलकर्णी हे दोघेही अभिनयात उत्तम आहेत परंतु कमकुवत लिखाणामुळे त्यांच्या अभिनयाला तेवढासा वाव मिळत नाही.चित्रपटातील गाणी हा चित्रपटातील महत्वाचा भाग आहे. 

मला सॉरी म्हणायचंय हे गाणं देखील चित्रपटातील सिच्युएशन ला साजेस आहे.संगीत दिग्दर्शक अवधूत गुप्ते, गायक-गायिका या सर्वांनी ‘माधुरी’ साठी उत्तम संगीत चित्रपटाला दिले आहे. मुंबापुरी प्रॉडक्शन आणि मोहसिन अख्तर यांचा माधुरी हा पहिला मराठी चित्रपट, सोनाली कुलकर्णीचा हटके लूक, संपूर्ण स्टारकास्टचा अभिनय ह्यामुळे माधुरी चित्रपटाला itsmajja.com तर्फे ३ स्टार्स.