आपला दमदार अभिनय आणि त्याच सोबत दिग्दर्शकीय दृष्टीकोन असणारा अभिनेता प्रसाद ओक याने नेहमीच प्रेक्षकांच मनोरंजन केले आहे. आणि हे मनोरंजन फक्त त्याच्या चित्रपटांमधून नाही तर, सोशल मिडियावरून सुद्धा दिसून येत. मग त्यामध्ये विविध प्रकारच्या पोस्ट असुदे किंवा मग त्याने स्वतः लिहिलेले काही कोट्स या सगळ्यांमधून प्रसादची विनोदबुद्धी दिसून येते. 

पण याव्यतिरिक्त सुद्धा प्रसादाची अजून एक बाजू आपल्या समोर येते आणि ती म्हणजे त्याच फॅशन सेन्स. प्रसाद ओक त्याच्या इंस्टाग्राम अकाउंटवरन नेहमी प्रेक्षकांसोबत जोडला गेलेला असतो. आणि याच इंस्टाग्रामचा वापर करत, प्रसादने त्याच्या फॅशन सेन्सची जबर ओळख आपल्याला करून दिली आहे. प्रसाद ओक सध्या सोनी मराठी वाहिनीवरील महाराष्ट्राची हास्यजत्रा या कार्यक्रमामध्ये परीक्षक म्हणून काम करत आहे. आणि याच कार्यक्रमधून प्रसादची स्टाईल आयकॉन छबी आपल्याला दिसून येते. कधी वेस्टर्न तर कधी पारंपारिक पोषकमध्ये असणारा प्रसाद ओक नेहमीच सगळ्या प्रेक्षकांच्या पसंतीस पडत आहे. आणि त्याचा हा रुबाब सुद्धा मराठी कलाकारांपासून ते सगळ्या प्रेक्षकांना आवडत आहे. आपल्या कामामधून प्रेक्षकांना काही तरी नवीन आणि वेगळं देण्याच्या धडपडीमध्ये असणारा हा अभिनेता, फॅशनच्या बाबतीत सुद्धा कोणापेक्षा कमी नाही आहे, हे त्याने पटवून दिले आहे.