आपल्या कलाकृती मधून प्रेक्षकांना प्रेमाची नवीन परिभाषा शिकवणारे, दिग्दर्शक संजय जाधव नेहमीच आपल्यासमोर कहि तरी नवीन सादर करत असतात. मग त्यामध्ये दुनियादारी मधील मैत्री असो, ये रे ये रे पैसा मधील हास्याचा कल्लोळ असो किंवा मग खारी बिस्कीट मधील बहीण भावाचं नात, या सगळ्या गोष्टीमुळे संजय जाधवच्या कलाकृतींवर प्रेक्षक भरपूर प्रेम करतात. 

आणि आता याच हरहुन्नरी दिग्दर्शकाने, एक नवीन उपक्रम सुरू केला आहे. म्हणजेच अभिनय आणि फिल्म मेकिंगची आवड असणाऱ्या सगळ्यांसाठी संजय जाधव याने, Filmmagic नावाची नवीन इन्स्टिट्यूट सुरू केली आहे. It's All About Learning The Magic... It's Filmmagic अस देत. मराठी कलाकारांनी इंस्टाग्राम वर Filmmagic या इन्स्टिट्यूटची एक छोटी व्हिडिओ शेअर करत सगळ्या प्रेक्षकांना हि बातमी दिली आहे. या इन्स्टिट्यूट मध्ये फिल्म मेकिंग, व्हिडिओ एडिटिंग, फोटोग्राफी, स्क्रिप्ट रायटिंग यांसाखरे अनेक कोर्स शिकायला मिळणार आहेत. आपल्या कलाकृतीमधून प्रेक्षकांना काही तरी नवीन देण्याच्या धडपडीमध्ये असणाऱ्या या दिग्दर्शकाच्या इन्स्टिट्यूट मधून नवीन फिल्ममेकर्स सुद्धा आपल्या समोर येतील यामध्ये सुद्धा काही वाद नाही.