माझ्या नवऱ्याची बायको हि मालिका प्रेक्षकांसमोर नेहमीच काही तरी नवीन आणि थक्क करून टाकणाऱ्या गोष्टी सादर करते. मग त्यामध्ये सौमित्रचं पिंकी म्हणून गुरुनाथच्या समोर येणं असुदे किंवा राधिका आणि शनायाच एकत्र येऊन, गुरुनाथला धडा शिकवणं. हि मालिका आज सुद्धा प्रेक्षकांचं भरपूर मनोरंजन करत आहे. 

या व्यतिरिक्त या मालिकेमधील कलाकारांची सेटवर तेवढ्याच चांगल्या पद्धतीने धम्माल मजामस्ती सुरु असते. आणि याच एक उत्तम उदाहरण म्हणजे मालिकेमधली मुख्य कलाकार गुरुनाथ सुभेदार, म्हणजे आपला लाडका अभिनेता अभिजीत खांडकेकर याने सेट वरील मस्तीचा एक विडिओ इंस्टाग्राम वर शेअर केला आहे  झी मराठी वाहिनी वर सुरु झालेली नवीन मालिका, लाडाची मी लेक गं या मालिकेच्या शीर्षक गीतावर, अभिजित गुरु, किशोरी आंबिये आणि स्वतः अभिजीत खांडकेकर याने एक धम्माल असं सादरीकरण केलं आहे. ज्यामध्ये लाडाची मी लेक गं मालिकेच्या शीर्षक गीताच्या ओळींवर, बस ड्रॉयव्हर कश्या पद्धतीने बस चालवतो आणि त्याचा त्रास बस मधील इतर प्रवाश्याना कसा होतो, याचा व्हिडिओ पोस्ट केला आहे. लाडाची लेक गं, Driving us crazy असं मजेशीर कॅप्शन देत अभिजीतने हा व्हिडिओ शेअर केला आहे. फक्त एवढंच नाही तर याआधी सुद्धा अभिजीतने सेट वरील धम्माल किस्स्यांचे व्हिडिओ इंस्टाग्रामवर शेअर केले आहे. आणि त्याच्या या व्हिडिओ वरून आपल्याला कळून सुद्धा येते कि, शूटिंग सोबतच सेटवर धम्माल सुद्धा जोरदार अशी होते.