प्रत्येक कलाकार हा त्याच्या अभिनयाने आणि त्याच्यामधील एक आदर्श कलागुणांमुळे प्रसिद्ध आणि आपल्या पसंतीस पडतो. पण या कलाकारांना प्रसिद्ध करतो तो म्हणजे त्याचा चाहता, त्यांचा फॅन आणि एका चाहत्याने कलाकाराचे केलेले कौतुक हे सगळयात महत्वाचं असं असतं. 

आणि आजच्या सोशल मिडियामुळे तर  कलाकार आणि त्यांच्या चाहत्यांमधील अंतर हे  खुपचं कमी झाले आहे. आणि याच एक उत्तम उदाहरण म्हणजे सध्या सगळ्या मराठी कलाकारांच्या इंस्टाग्राम अकाउंटवर असणारा त्यांचा चाहता महेश कापसे. महेश कापसे हा एक चित्रकार असून, माही आर्टिस्ट असं त्याच्या इंस्टाग्राम पेजचा नाव असून, वॉटर कलरचा वापर कारात काही मिनीटांतच महेश कलाकारांचं चित्र काढून आपल्यासमोर सादर करतो. आणि त्याच्या या कलाप्रेमाला मराठी कलाकारांनी सुद्धा भरभरून दाद दिली आहे. महेशने आता पर्यंत, सोनाली कुलकर्णी, सिद्धार्थ जाधव, सुबोध भावे, संस्कृती बालगुडे, वैभव तत्ववादी यांसारख्या मराठी कलाकारांची चित्रे काढली असून, त्यांच्या कामाचं एका वेगळया प्रकारे कौतुक केले आहे. महेशने फक्त मराठी कलाकाराचं नाही तर दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीमधील कलाकार, खेळाडू, गायक आणि इतर नामवंत व्यक्तीचं सुद्धा चित्र काढून, महेश त्यांच्या कामाला एक वेगळ्या पद्धतीने मानवंदना देतो.