मराठी अभिनेत्री मृण्मयी देशमुख हिने तिच्या अभिनयाच्या जोरावर तिचा एक वेगळा चाहता वर्ग बनवला आहे. मृण्मयी फक्त एक अभिनेत्री म्हणून नाही तर, एक यशस्वी दिग्दर्शिका म्हणून सुद्धा आपल्यासमोर आली आहे. आणि या अभिनेत्री जेवढं तिच्या अभिनय कौशल्यावर प्रेम आहे तेवढंच प्रेम निसर्गावर सुद्धा आहे. आणि याचं एक उत्तम उदाहरण म्हणजे मृन्मयीने केलेलं शेतकाम, 

नुकतंच मृण्मयीने तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर एक फोटो शेअर केला आहे. ज्यामध्ये तिने शेतकाम पूर्ण केल्यानंतरचा आनंद आपल्या समोर सादर केला आहे. आम्ही १४ veggi beds बनवून पेरणी पूर्ण केली... ७ दिवस सतत न थकता काम चालू होतं... आता पुढच्या टप्प्याकडे वळणार..असं कॅप्शन देत मृण्मयीने हा फोटो शेअर केला आहे. ज्यामध्ये तिचा नवरा स्वप्नील आणि तिचे काही मित्र सुद्धा आहेत. या आधी सुद्धा मृण्मयीने तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर एक विडिओ शेअर केला होता ज्यामध्ये ती, उपयोगी नसलेले तण काढून टाकतं जागा साफ केली आहे. आपल्या अभिनयातून प्रेक्षकांना काही तरी नवीन देण्याच्या धडपडीमध्ये असणारी हि सुंदर अभिनेत्री आपण निसर्गाचं सुद्धा काही तरी देणं लागतो या विचाराने मृण्मयी आणि स्वप्नीलने शेतीच काम पूर्ण करतं, निसर्गाचा आनंद लुटला आहे.