प्रत्येक कलाकार हा स्वतःच्या कामाला घेऊन जेवढा महत्वकांक्षी असतो, तेवढाच तो स्वतःच्या लूकला घेऊन सुद्धा नेहमीच चर्चेत असतो. मग त्यामध्ये विविध तऱ्हेचे केलेले फोटोशूट असो किंवा संपूर्णपणे बदललेला त्यांचा अवतार आणि हाच अवतार नंतर ट्रेंड मध्ये सुद्धा येतो. असाच काहीसा लूक मराठी चित्रपटश्रुष्टीमधील अभिनेता प्रसाद ओक याने  केला आहे. 

अभिनेता प्रसाद ओकच्या निराळ्या आणि आगळ्यावेगळ्या कल्पना शक्तीला खरंच कसलीच तोड नाही आहे. नेहमीच आपल्या नानाविविध भन्नाट पोस्टमुळे किंवा त्याच्या फॅशन सेन्समुळे सोशल मिडीयावरुन तो प्रेक्षकांच्या चर्चेचा विषय बनतो. मग खूप वेळेला त्याच्या या पोस्ट सामाजिक विषयांशी निगडित जरी असून काहीश्या बोचक अश्या असतात, पण तेव्हढ्याच गंमतीशीर सुद्धा असतात. प्रसाद त्याच्या लुकला घेऊन सुद्धा चाहत्यांच्या चर्चेचा विषय बनला आहे. दरवेळेला एक जेंटलमॅनच्या अवतारामध्ये आपल्यासमोर आलेल्या प्रसादने यावेळी, त्याच्यासाठी एक आगळा वेगळा चष्मा बनवून घेतला आहे. ज्यामध्ये चष्म्याची एका बाजू गोल तर दुसरी बाजू हि चौकोनाकृती अशी आहे. आणि हा चष्मा प्रसादच्या चेहेऱ्यावर खूप चांगल्या पद्धतीने शोभत सुद्धा आहे. प्रसाद ओकच्या या चष्म्याला मराठी कलाकारांनी सुद्धा कमेंट्स करत त्याच कौतुक केलं आहे ज्यामध्ये, सिद्धार्थ जाधवने, नटाच्या आणि दिग्दर्शकाच्या नजरेतून एकाचवेळेस पाहण्याचा योग.. तर अमृता खानविलकर हिने, Visionary तुम्हला आवडेल ती निवडा अशी कमेंट केली आहे. आपल्या अभिनयातून आणि दिग्दर्शनातून काही तरी वेगळं देण्याच्या प्रयत्नामध्ये असणारा हा हरहुन्नरी कलाकार, त्याच्या लूकमुळे सुद्धा चाहत्यांच्या चर्चेचा विषय बनत आहे.