मी मिरवणार आण समद्यांची जिरवणार... असं म्हणतं आपल्या भेटीला आलेली सुमी आणि मुख्यमंत्री म्हणून भेटीला आलेला समर या दोघांनी मिसेस मुख्यमंत्री या मालिकेमधून प्रेक्षकांचं भरपूर मनोरंजन केलं. एक आगळी वेगळी गोष्ट आणि त्यापेक्षा जबरदस्त त्या मालिकेमधील कलाकार या सगळ्यांमुळे मिसेस मुख्यमंत्री या मालिकेने तिचा एक वेगळा चाहता वर्ग बनवला आहे. परंतु आता हि मालिका आपला निरोप घेत आहे. 

नुकतंच मालिकेमधील मुख्य कलाकार अभिनेता तेजस बर्वे याने, अमृता सोबतचा एक फोटो इंस्टाग्राम अकाउंटवर शेअर केला आहे. ज्यामध्ये तेजसने  "शेवटचं समर आणि सुमी साकारताना, शेवटच्या दिवसाच्या चित्रीकरणाची आठवण." असं कॅप्शन दिल आहे. याउलट अभिनेत्री अमृता धोंगडे हिने सुद्धा तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर, मालिकेमधील शेवटचा सिन शूट करतानाचा व्हिडिओ शेअर केला आहे. सुमीची खानावळ ते मंत्रीपाटलांची सून हा प्रवास तसा अवघडच होता ,पण मंत्री पाटलांची सून ते साखर कारखान्याची चेरमन हा प्रवास तर त्याहूनही अवघड होता..असं भावनिक कॅप्शन देत अमृताने  मालिकेमधील शेवटचा सिन शूट केला आहे. आपल्या सगळ्यांचं मनोरंजन करत आणि दरवेळेला प्रेक्षकांना हसवत ठेवणारी हि मालिका आता आपला निरोप घेत आहे. आपल्या अभिनयातून प्रेक्षकांच्या मनात एक घर केले आहे आणि पुढे सुद्धा हि मालिका अशीच प्रेक्षकांच्या मानत राहील एवढं मात्र नक्की, आणि मालिकेच्या जागेवर आपल्याला, मिताली मयेकर आणि स्मिता तांबे यांची मुख्य भूमिका असलेली 'लाडाची मी लेक गं'  हि मालिका आपल्या भेटीला येणार आहे.