बिग बॉस सीजन १ मधून आपल्या समोर आलेला एक हँडसम, चार्मिंग अभिनेता पुष्कर जोग याने खूप कमी वेळातच प्रेक्षकांच्या मनात घर केले. आपला अभिनया सोबतच, नृत्याची आवड असणाऱ्या या कलाकाराने लॉकडाऊनमध्ये प्रेक्षकांच भरपूर मनोरंजन केलं. लॉकडाऊनमध्ये पुष्करने सुद्धा स्वतःच युट्युब चॅनेल सुरु करत नृत्याचे अनेक व्हिडिओस त्याने त्याच्या चाहत्यांसमोर सादर केले. 

नुकतंच पुष्करने त्याच्या इंस्टाग्राम अकाउंटवर एक टिझर व्हिडिओ शेअर केला आहे. ज्यामध्ये आपल्याला एक लावणी नृत्यप्रकार बघायला मिळत आहे. मात्र या पोस्ट मध्ये त्या  नृत्यांगनेचा चेहरा झाकण्यात आला आहे. आता ही नृत्यांगना नेमकी कोण आहे हा प्रश्न सगळ्यांना पडला आहे. आणि याच प्रेक्षकांना पडलेल्या या प्रश्नांच उत्तर देत, पुष्करने अजून एक पोस्ट शेअर केली आहे. ज्यामध्ये हि नृत्यांगना खुद्द पुष्करचं असल्याचं कळून येत. नृत्य, संगीत, अभिनयाचे सुंदर सादरीकरण म्हणजे 'लावणी'! या अतिशय श्रुंगारलेल्या नृत्य प्रकाराला सादर करण्याचं धाडस केलं आहे! उत्स्फुर्त प्रतिसाद मिळू देत हिच इच्छा... असं कॅप्शन देत पुष्करने हा धाडसी प्रयत्न केला आहे. आणि लवकरचं पुष्करचा हा लावणी नृत्यप्रकार त्याच्या युट्युब चॅनेल वर बघायला मिळणार आहे असं सुद्धा सांगितलं आहे. आपल्या चाहत्यांना काही तरी नवीन आणि वेगळं देण्याच्या प्रयत्नामध्ये असणाऱ्या पुष्करने अजून एक पल्ला गाठत, स्त्रीवेषामध्ये लावणी सादर केली आहे. आणि त्याच्या या प्रयत्नाला सुद्धा प्रेक्षक तेवढाच चांगला प्रतिसाद सुद्धा देतील एवढं मात्र नक्की...