प्रियदर्शन जाधव लिखित आणि दिग्दर्शित या चित्रपटात अमृता खानविलकर, जितेंद्र जोशी, हेमंत ढोमे, अनिकेत विश्वासराव आणि क्षिती जोग अशी जबरदस्त स्टारकास्ट असणारा, चोरीचा मामला या चित्रपटाने प्रेक्षकांना हसवत ठेवले. चोरी करायला गेलेला एक प्रामाणिक चोर आणि नंतर त्याच्या अवतीभवती घडणाऱ्या सगळ्या गोष्टी याच सगळं मिश्रण असलेल्या या चित्रपटाने प्रेक्षकांचे मनोरंजन केले. 

आणि आता लवकरचं या चित्रपटाचा दुसरा भाग सुद्धा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. हेमंत ढोमे याने त्याच्या इंस्टाग्राम पेजवर याची बातमी दिली आहे. आणि  चोरीचा मामला २ हा पहिला मराठी चित्रपट असणार आहे जो मल्याळम, तेलुगू, तमीळ, कन्नड आणि हिंदी या भाषांमध्ये तयार होणार आहे. एक बंगल्यामध्ये चोरी करायला गेलेला एक प्रामाणिक चोर, आणि नंतर त्या बंगल्यामध्ये घडणाऱ्या साऱ्या गोष्टींची चंगळ आपल्याला या चित्रपटामध्ये बघायला मिळाली. मग त्यामध्ये जितेंद्र जोशींने साकारलेला मराठी चोर ज्याचा अचानक झालेला कोंकणी पंजाबी माणूस असो, किंवा मग आपल्याला पोलिसांच्या कामाला कंटाळलेला अनिकेत विश्वराव असो, चोरीचा मामला हा चित्रपट त्यामधील मजेशीर संवाद, कलाकारांचे उत्तम अभिनय, आणि प्रत्येक कलाकाराची अचूक विनोदी टायमिंग या सगळ्यामुळे हा चित्रपट प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यात यशस्वी ठरला. तूर्तास तरी चोरीचा मामला २ या चित्रपटामध्ये आधी जी स्टारकास्ट होती तिचं, आता सुद्धा असेल का ? कि अजून नवीन कलाकार आपल्याला यामध्ये बघायला मिळतील हे मात्र गुलदस्त्यात आहे.