आपल्या वडिलांच्या पावलांवर पाऊल ठेवतं, अभिनय क्षेत्रामध्ये आपल्या नावाचा डंका वाजवणारा अभिनेता म्हणेजच गश्मीर महाजनी हा सोशल मिडीयावर खूप जास्त सक्रिय आहे. आणि याच सोशल मिडीयाचा वापर करत, गश्मीर नेहमीच त्याच्या चाहत्यांसमोर नवं नवीन व्हिडिओस आणि उपक्रम घेऊन येत असतो. मग त्यामध्ये त्याच्या वर्कआऊट व्हिडिओस असो किंवा, डान्स व्हिडिओस गश्मीर नेहमीच आपल्यासाठी काही तरी नवीन घेऊन यते असतो. 

आणि आता नुकतंच गश्मीरने त्याच्या मुलाचा एक व्हिडिओ इंस्टाग्राम वर शेअर केला आहे.  ज्यामध्ये गश्मीरचा मुलगा, गश्मीर ज्या पद्धतीने चालत आहे त्याच पद्धतीने हुबेहूब चालण्याचा प्रयत्न करत आहे. जबाबदारीने चाला. कुणीतरी आपल्या पाऊलावर पाऊल टाकत आहे...  असं कॅप्शन देत गश्मीरने हा व्हिडिओ इंस्टाग्राम अकाउंटवर शेअर केला आहे. याआधी सुद्धा गश्मीरने त्याच्या मुलासोबतचे फोटोज आणि व्हिडिओस शेअर केले आहेत. आणि गश्मीरच्या मुलाच्या या व्हिडिओचं, मराठी कलाकारांनी सुद्धा कौतुक केले आहे. जेष्ठ अभिनेते रवींद्र महाजनी यांच्याच पावलांवर पाऊल टाकत गश्मीरने, अभिनयाला सुरवात केली आणि आता जश्याच तस  गश्मीरचा मुलगा सुद्धा त्याच्या पाऊलांवर, पाऊल टाकतं पुढे येत आहे.