अभिनेता चिराग पाटील आणि त्याचे वडील माजी क्रिकेटर संदीप पाटील हि बापलेकाची जोडी नेहमीच काही तरी नवीन आपल्यासमोर सादर करत असते. मग त्यामध्ये ८३ या चित्रपटासाठी चिरागने, संदीप सरांकडून घेतलेलं क्रिकेटचं प्रशिक्षण असो किंवा त्या दोघांच्या काही व्हिडिओस या सगळ्या गोष्टींमधून हि जोडी नेहमीच सगळ्यांच्या चर्चेचा विषय असते. 

नुकतंच चिराग पाटील याने, आज शिक्षक दिनाच्या निमित्ताने त्याच्या आई वडिलांसाठी भावनिक अशी पोस्ट लिहीत त्यांना, शिक्षक दिनाच्या शुभेच्छा दिली आहेत.  चिरागचे आई-वडिल हे त्याच्यासाठी मोठे शिक्षक असल्याचं तो सांगतो. चिरागने आई बाबांचा फोटो शेअर करत, आई बाबांनी त्याला जो कानमंत्र दिला आहे.  त्याबद्दल लिहिले आहे ज्यामध्ये चिराग त्याच्या वडिलांसाठी, "बाबा मला नेहमी सांगतात की आयुष्य हे लहान आणि अप्रत्याशित आहे. तेव्हा प्रत्येक क्षणाचा आनंद लुटा आणि किंग साईज आयुष्य जगा, असे लिहिले आहे. तर आईने त्याला  नेहमी एक चांगला माणूस हो आणि आपल्या वडीलधाऱ्या माणसांचा आपल्या ज्येष्ठांचा आदर करत नेहमी नम्र राहायला सांगितले आहे. अश्या भावनिक पोस्ट शेअर करत चिराग पाटील याने त्याच्या आयुष्यामधील सगळ्यात पहिल्या शिक्षकांना वंदन केले आहे.