अनलॉक मध्ये शिथिलता आणल्यानंतर सगळ्याचं गोष्टी हळू हळू पूर्वपात पदावर सुरु होत आहेत. आणि यामध्ये मनोरंजन इंडस्ट्रीचा सुद्धा समावेश आहे. आणि आता शासनाने आखून दिलेल्या नियमांचं पालन करून मालिकांच्या आणि चित्रपटांच्या शूटिंगला सुरवात झाली आहे. परंतु आज सुद्धा मनोरंजन इंडस्ट्री संपूर्णपणे सुरु नाही झाली आहे. आणि याच उदाहरण म्हणजे चित्रपट रिलीज होण्याचं महत्वाचं ठिकाण म्हणजेच चित्रपट थिएटर्स. 

अनलॉक झाल्यापासून सगळ्याच क्षेत्रांना परत पाहिल्यासारखे काम करण्याची संधी तर मिळाली आहे. परंतु आज सुद्धा चित्रपट थिएटर्स हि पूर्णपणे बंद आहेत. आणि यामध्ये सगळ्यात जास्त नुकसान हे सिंगल स्क्रिन थिएटर्सचं झालं आहे. आणि याच गोष्टीला अनुसरून, ठाण्यामधील वंदना सिंगल स्क्रिन थिएटरचे चालक आणि दिग्दर्शक विजू माने यांनी ठाण्यात थिएटर बाहेर आंदोलन केले आहे. लॉकडाऊन सुरु झाल्यापासून सगळी चित्रपटगृह बंद झाली होती, परंतु आता पाच महिन्यानंतर सुद्धा थिएटर्स उघडण्यावर कोणताच निर्णय नसल्यामुळे विजू माने आणि त्यांचे सहकारी रस्त्यावर उतरले आहेत. आणि एका वेगळ्याच पद्धतीने पण शांततेत आंदोलन केले आहे. ज्यामध्ये चित्रपटांच्या पोस्टर्सवर थिएटर्स उघडण्या संदर्भातील मेसेज लिहून ते पोस्टर्स हातात घेऊन हे आंदोलन करण्यात आले. अनलॉक सुरु झाल्यानंतरही अजून सुद्धा सिंगल स्क्रिन थिएटर्सचं बद्दल कोणतेच ठोस असे निर्णय न घेतल्यामुळे सगळ्याच थिएटर चालकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे.