स्वराज्यरक्षक संभाजी या मालिकेमधून आपल्यासमोर छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका साकारणारे अभिनेते डॉ. अमोल कोल्हे यांनी थोड्या वेळेसाठी मालिका आणि चित्रपटांमधून रजा घेतली आहे. आणि त्यांचा हा वेळ डॉ अमोल कोल्हे त्यांच्या राजकीय पक्षाला आणि सामाजिक कामामध्ये देत आहेत. परंतु आता अमोल कोल्हे यांनी एक आनंदाची बातमी त्यांच्या चाहत्यांना दिली आहे. 

आणि हि आनंदाची बातमी म्हणजे, लवकरचं अमोल कोल्हे पुन्हा एकदा आपल्याला मालिकेमध्ये काम करताना दिसणार आहे. आणि ती मालिका म्हणजे डॉ अमोल कोल्हे निर्मित, स्वराज्यजननी जिजामाता. 'स्वराज्यजननी जिजामाता' ही मालिका सध्या रोमांचक वळणावर आहे. जिजाऊ आणि शहाजीराजांनी स्वराज्यस्थापनेचा विडा उचलला आहे. जिजाऊ शिवबांना घेऊन पुण्यात आल्या आहेत. आता या पुढे मालिकेत प्रेक्षकांना स्वराज्य बांधणीची रोमांचकारी कथा आणि महाराष्ट्राचा दैदिप्यमान इतिहास पुन्हा अनुभवायला मिळणार आहे आणि याच दरम्यान प्रेक्षकांसाठी आनंदाची गोष्ट म्हणजे डॉ. अमोल कोल्हे 'स्वराज्यजननी जिजामाता' या मालिकेत एक खास भूमिका साकारणार आहेत. तूर्तास तरी डॉ. अमोल कोल्हे हे कोणत्या भूमिकेमध्ये आपल्याला बघायला मिळतील हे गुलदस्त्यात आहे. आणि स्वतः अमोल कोल्हे यांनी त्यांच्या इंस्टाग्राम अकाउंटवर, अ सरप्राईज! साधारण ८ महिन्यांनंतर पुन्हा...दिनांक २ सप्टेंबर पासून..."स्वराज्यजननी जिजामाता" सोनी मराठी वाहिनीवर असं कॅप्शन देत एक फोटो शेअर करत ते पुन्हा एकदा मालिकेमध्ये दिसणार असल्याची माहिती प्रेक्षकांना दिली आहे. आणि परत एकदा डॉ. अमोल कोल्हे यांना मालिकेमध्ये एक जबरदस्त भूमिका साकारताना बघायचं आहे तर, पाहा स्वराज्यजननी जिजामाता' सोम-शनि., रात्री ८:३० वा. फक्त आपल्या सोनी मराठी वाहिनीवर.