सध्या लॉकडाऊनमध्ये अनेक नवीन मराठी मालिकांचे प्रोमो आपल्या भेटीला आले, आणि या मालिका आपल्याला वेगवेगळ्या वहिनींवर बघायला सुद्धा मिळाल्या. याच काळात अनेक जुन्या मालिकांनी आपला निरोप घेतला आणि त्यांच्या जागेवर नवनवीन विषय असणाऱ्या मालिका आपल्या भेटीला आल्या आणि आज सुद्धा या मालिका आपलं मनोरंजन करत आहेत. 

नुकतंच एका नवीन मालिकाच प्रोमो आपल्या भेटीला आला असून  मराठी चित्रपट सृष्टीमधील आघाडीचा अभिनेता सुबोध भावे याची निर्मिती असलेली ही पहिली मराठी मालिका असणार आहे. सध्या सगळीकडे सोशल मिडीयाचा वापर खूप चांगल्या पद्धतीने होत आहे. मग त्यामध्ये ऑनलाईन चॅटिंग असो किंवा ऑनलाईन मिटिंग आणि याच विषयावर भाष्य करत, सुबोध भावेच्या कान्हाज मॅजिक या निर्मिती संस्थेअंतर्गत  "शुभमंगल ऑनलाईन" या मालिकाचा प्रोमो सुबोधने त्यांच्या इंस्टाग्राम अकाउंटवर शेअर केला आहे. प्रोमो मध्ये आपण अभिनेत्री सायली संजीव आणि अभिनेता सुयश टिळक यांना बघू शकतो. त्यांच्याच जोडीला अभिनेत्री सुकन्या कुलकर्णी-मोने यांची सुध्दा एक महत्त्वपूर्ण भूमिका असल्याचं कळतंय. कलर्स मराठी वाहिनी "शुभमंगल ऑनलाईन" या प्रोमोमधून हि मालिका ऑनलाईन लग्नव्यवस्थेवर आधारित आहे हे कळून येते. Digital युगात होती Video Call वरच साऱ्या भेटीगाठी, जुळतील का आता Online लग्नाच्याही गाठी? पाहा नवी गोष्ट.. असं कॅप्शन देत मालिकेमधील मुख्य कलाकार सायली संजीव आणि सुयश टिळक यांनी सुद्धा त्यांच्या इंस्टाग्राम अकाउंटवर मालिकेचा प्रोमो शेअर केला आहे. या मालिकेमधून आपल्याला सायली संजीव आणि सुयश टिळक यांची ऑनस्क्रीन धम्माल केमिस्ट्री आपल्याला बघायला मिळणार आहे.