सध्या लॉकडाऊमध्ये शिथिलता आणल्या पासून सगळ्या मालिका आणि चित्रपटांच्या शूटिंगला सुरवात झाली आहे. पण अद्याप तरी व्हायरसचा प्रादुर्भाव हा टळला नसून,  या प्राणघात विषाणूमुळे आतापर्यंत हजारो लोकांनी आपले प्राण गमावले आहेत. अनेक मोठमोठे सेलिब्रिटी देखील या व्हायरसच्या विळख्यात अडकले आहेत. आणि आता मराठी चित्रपटसृष्टीमधील आघाडीचा कलाकार सुबोध भावे आणि त्याच्या कुटूंबाला या व्हायरसची लागण झाली आहे. 

नुकतंच खुद्द सुबोधने हि बातमी त्याच्या इंस्टाग्राम अकाउंटवर शेअर करत त्याच्या चाहत्यांना सांगितली. सुबोधसह त्याची पत्नी मंजिरी आणि मोठा मुलगा कान्हा यांची सुध्दा चाचणी पॉझिटिव्ह आली असून ते घरीच क्वारंटाईन झाले आहेत. “मी, मंजिरी आणि माझा मोठा मुलगा कान्हा आम्हा तिघांनाही कोरोनाची लागण झाली आहे. आम्ही घरीच स्वतःला क्वारंटाईन करून घेतले आहे. आम्ही तज्ज्ञ डॉक्टरांच्या मार्गदर्शनाने उपचार घेत आहोत. तुम्ही सगळे काळजी घ्या आणि सुरक्षित रहा. गणपती बाप्पा मोरया. असं कॅप्शन देत सुबोधने स्वतःसोबत चाहत्यांना सुद्धा सुरक्षित राहण्याचे आव्हान केले आहे. अनलॉक झाल्यापासून अनेक मालिकांची शूटिंग सूर झाली होती. आणि यामध्ये सुबोधने सुद्धा अनलॉकनंतर कामाला सुरुवात केल्याचा आनंद व्यक्त केला होता. परंतु अजून सुद्धा या व्हायरसचा प्रादुर्भाव कमी झाला नसल्यामुळे भावे कुटुंब या व्हायरसच्या विळख्यात आले आहे. पण घरामध्येच क्वारंटाईन असल्यामुळे आणि योग्य ते उपचार घेतल्यानंतर सुबोध भावे आणि त्याचे कुटूंब पुन्हा एकदा उभे राहतील यामध्ये काही वाद नाही.