मराठी चित्रपट सृष्टीमधील पॉवरपॅक एनर्जी मॅन म्हणजेच अभिनेता सिद्धार्थ जाधव आणि आपला सगळ्यांचा लाडका सिद्धू सोशल मिडीयावर खूप चांगल्या पद्धतीने ऍक्टिव्ह असतो. आणि याच सोशल मिडीयाचा वापर करून सिद्धार्थ नेहमी आपल्यासमोर त्याच्या नवीन प्रोजेक्ट्ची माहिती देत असतो. मग त्यामध्ये त्याचा येणार नवीन चित्रपट असो किंवा, एखादी नवी जाहिरात सिद्धार्थ नेहमीच सोशल मिडियामार्फत त्याच्या चाहत्यांसोबत जोडला गेलेला असतो. 

 याच सोशल मिडीयाचा वापर करत सिद्धार्थ जाधवने एक नवं-कोरं फोटोशूट चाहत्यांच्या भेटीला आणलं आहे. आपल्या अभिनयातून प्रेक्षकांना थक्क करून सोडणारा सिद्धू त्याच्या फोटोशूट मधून सुद्धा प्रेक्षकांच्या चर्चेचा विषय बनत आहे. क्या बोलती publiccccc ?.. #आपलासिध्दू  असं भन्नाट कॅप्शन देत सिद्धार्थ जाधव याने त्याचे हे फोटोज इंस्टाग्राम अकाउंटवर शेअर केले आहेत. आणि प्रेक्षकांप्रमाणेच आपल्या मराठी कलाकारांनी सुद्धा सिद्धार्थच्या या फोटोज लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे. ज्यामध्ये हेमंत ढोमे, प्रसाद ओक, सोनाली कुलकर्णी, तेजस्विनी पंडित, प्रार्थना बेहेरे आणि उमेश कामतने सुद्धा सिद्धार्थच्या या फोटोशूटसह कौतुक केले आहे. पॉवरपॅक एनर्जी मॅन म्हणून ओळखला जाणारा आपल्या सगळ्यांचा लाडका सिद्धू कोणत्या ना कोणत्या कारणांवरून प्रेक्षकांच्या चर्चेमध्ये असतोच, आणि आताच्या या फोटोशूटने सुद्धा सिद्धार्थ जाधव याने साऱ्यांची मने जिंकली आहेत.