सध्या सगळीकडे आपल्या लाडक्या बाप्पाचे कौतुक सोहळा सुरु आहे. आणि हा कौतुक सोहळा आपले मराठी कलाकार सुद्धा खूप चांगल्या पद्धतीने साजरा करत आहे. मग त्यामध्ये घरी बनवलेला ईको फ्रेन्डली बाप्पा असो किंवा, मग शाडूच्या मातीपासून बनवलेला बाप्पा, सारेच कलाकार त्यांना जस शक्य आहे, त्यापद्धतीने आपल्या लाडक्या बाप्पाची मनोभावे पूजा आणि आराधना करत आहेत. सध्याच्या परिस्थिती वर मात करत आपल्या बाप्पाने, साऱ्यांचे विघ्न दूर करावे अशीच प्रार्थना सारेजण करत आहेत. 

याच दरम्यान अभिनेता आणि दिग्दर्शक, प्रसाद ओकच्या पत्नीने म्हणेजच मंजिरी ओकने एक वेगळ्या पद्धतीने बाप्पाला वंदन केले आहे. आपल्या सगळ्यांना माहित आहे कि, मंजिरी एक खूप चांगली अशी सुगरण आहे, आणि ती नेहमीच तिने बनवलेल्या खाद्यपदार्थांचा फोटो इंस्टाग्रामवर शेअर करते. फक्त महाराष्ट्रीयन खाद्यपदार्थ नाही तर, इतर प्रांतांमधील रुचकर पदार्थ सुद्धा मंजिरी बनवत असते. नुकतंच मंजिरीने बाप्पाला तिच्या पाककलेतून अनोखी मानवंदना दिली आहे. अन्न हे पूर्णब्रह्म..आणि बाप्पाच्या कृपेने ह्याची कमतरता कुणालाही कधी पडू नये, असं कॅप्शन देत मंजिरीने तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर कटलेटचा वापर करून, सुंदर असा बाप्पा साकारला आहे. आणि यामधूनच मंजिरी ओकने बाप्पाकडे प्रार्थना सुद्धा केली आहे. मंजिरीने साकारलेल्या या बापाच्या रुपाला सोशल मिडीयावर खूप चांगला प्रतिसाद मिळत आहे. आणि त्याच सोबत तिच्या या फोटोवर लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव सुद्धा होत आहे.