जय मल्हार, गणपती बाप्पा मोरया आणि विठू माऊली यांसारख्या गाजलेल्या आणि लोकप्रिय अश्या पौराणिक मालिका आपल्या भेटीला घेऊन येणारे कोठारे व्हिजन्स आता आपल्यासमोर नवी मालिका घेऊन येत आहे. पौराणिक मालिकांचे महत्व आणि त्यामागील कथेचा सारांश नेहमीच कोठारे व्हिजन्स आपल्यासमोर मांडत आले आहेत. आणि याच पौराणिक मालिकांमध्ये अजून एक मालिका आपल्या भेटीला येत आहे. आणि ती म्हणजे जोतिबाच्या महात्म्यावर आधारित ‘दख्खनचा राजा ज्योतिबा’ ही मालिका. 

स्टार प्रवाह आणि कोठारे व्हिजन्स निर्मित, ‘दख्खनचा राजा ज्योतिबा' या मालिकेचे भूमिपूजन पार पडले आहे. उर्मिला कोठारे आणि महेश कोठारे यांनी त्याच्या इंस्टाग्राम अकाउंटवर, या आमच्या आगामी मालिकेचं 'कोल्हापूर चित्रनगरी' मध्ये सेट उभारणीचा भूमिपूजन कार्यक्रम संपन्न झाला, असं कॅप्शन देत भूमिपूजनाचा एक व्हिडिओ शेअर केला आहे. कोल्हापूर चित्रनगरीत  ‘दख्खनचा राजा ज्योतिबा' या मालिकेचा भव्य सेट उभारण्यात येणार आहे. भूमिपूजन समारंभ रविवारी पार पडले असून, निर्माता महेश कोठारे, नीलिमा कोठारे, आदिनाथ कोठारे, उर्मिला कोठारे आणि कला दिग्दर्शक संतोष फुटाणे सुद्धा यावेळी उपस्थित होते. तूर्तास तरी या मालिकेमध्ये कोणते कलाकार दिसणार हे गुलदस्त्यात आहे. आणि त्याचसोबत दख्खनचा राजा ज्योतिबा या मुख्य भूमिकेत कोणता कलाकार आपल्या समोर येईल हे पाहण्यात सुद्धा खरी रंगत आहे. पण जय मल्हार, गणपती बाप्पा मोरया आणि विठू माउली यांसारख्या मालिकेनंतर, ‘दख्खनचा राजा ज्योतिबा' हि मालिकासुद्धा प्रेक्षकांचं मनोरंजन करेल यामध्ये काही वाद नाही.