अभिनेत्री सोनाली कुलकर्णीने तिचा होम क्वारंटाईन वेळ दुबईला कुणाल सोबत राहून खूप चांगल्या पद्धतीने घालवला. आणि या दरम्यान नेहमीच सोशल मिडियामार्फत सोनालीने तिच्या क्वारंटाईन ऍक्टिव्हिटीज आपल्या समोर शेअर सुद्धा केल्या, मग त्यामध्ये स्वतःला फिट ठेवण्यासाठी केलेला योगा असो किंवा मग कुकिंग क्लासेस, सोनालीने तिचा होम क्वारंटाईन वेळ हा खूप चांगल्या पद्धतीने घालवला असं बोलायला काही हरकत नाही. 

पण आता सोनाली दुबईवरून तिच्या घरी आली आहे. आणि घरी येताच तिने इंस्टाग्राम वर एक व्हिडिओ शेअर केला आहे. ज्यामध्ये घरी परत आल्यानंतर तिचा क्वारंटाईन वेळ कश्या पद्धतीने घालवायचा यावर विचार करत असताना. सोनाली या काळात भगवद्तगीता वाचणार असल्याचं सांगितलं आहे. पण हे पुस्तक जेवढं खास आहे, त्यापेक्षा जास्त हे पुस्तक ज्याने भेट म्हणून दिल, तो व्यक्ती सुद्धा तेवढाच खास असल्याची माहिती तिने या व्हिडिओ मध्ये दिली आहे. सोनालीला हे पुस्तक, ऑफस्क्रीन कृष्ण म्हणजेच स्वप्नील जोशीने दिल आहे. एका कृष्णाने सांगितली एका ने मला भेट दिली... असं सुंदर कॅप्शन देत. सोनालीने, स्वप्नील जोशीचे आभार मानले आहे. आणि गोपाळकाल्याच्या दिवसाचं औचित्य साधत सोनालीने हि भगवद्तगीता वाचायला सुरवात केली आहे. आणि लवकरात लवकर पुन्हा एकदा सोनाली  आपल्या भेटीला येणार आहे असंहि तिने या व्हिडिओ मध्ये सांगितले आहे.