आपले मराठी कलाकार हे कामाच्या निमित्ताने आणि शूटिंगमुळे घरापासून लांब असले तरी, त्यांच्या घरी एक असा व्यक्ती असतो जो त्यांची वाट बघत असतो. तो म्हणजे त्यांचा पाळीव प्राणी, आज कित्येक मराठी कलाकारांकडे त्यांचे पाळीव प्राणी आहेत. आणि ते त्यांच्या सोबत घरातील एक जवाबदार व्यक्तींसारखेच वागतात. अशाच एका मराठी अभिनेत्रीने सुद्धा तिचं प्राण्यांवरील प्रेम हे वेळोवेळी आपल्यासमोर सादर केले आहे. आणि ती अभिनेत्री म्हणजे मानसी नाईक. 

मानसी नाईक हिला मांजरीची आवड आहे. आणि आज इंटरनॅशनल कॅट डेच्या निमित्ताने अभिनेत्री, मानसी नाईकने तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर एक मज्जेदार असा व्हिडिओ शेअर केला आहे. ज्यामध्ये मानसी तिच्या कडे असणाऱ्या एकूण १५ मांजरींना जेवण देत आहे.  A cat mom to 15, DONT Forget to say Meow Meow असं मज्जेदार कॅप्शन देत मानसीने हा व्हिडिओ शेअर केला आहे. आणि सर्व मांजर प्रेमींना इंटरनॅशनल कॅट डेच्या शुभेच्छा सुद्धा दिल्या आहेत. आपल्या नृत्याची अदाकारीने सगळ्या प्रेक्षकांना भूल घालणारी हि मराठमोळी अभिनेत्री १५ मांजरीची आई सुद्धा आहे. हे प्रथमच या व्हिडिओ मधून तिच्या चाहत्यांना कळालं आहे. आणि अनेक मराठी कलाकारानं प्रमाणे मानसी नाईक सुद्धा पाळीव प्राण्यांना किती जीव लावते आणि ते सुद्धा तिच्या कुटुंबातीलच एक भाग असल्याची ग्वाही आपला दिली आहे.